लखपती बनण्याची सुवर्णसंधी! पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणुक करून मिळवा भरघोस परतावा

मुंबई | तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवण्याचा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. कारण पोस्ट ऑफिसकडून आता लहान बचत योजना येत आहेत. यामध्ये गुंतवणुक करुन तुम्ही लखपती होऊ शकता. तसेच गुंतवणुकीच्या दुप्पट परतावा मिळवता येणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात प्रत्येकाला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. याकाळात अनेक लोकांनी केलेली गुतंवणुक खर्च झाली आहे. यानंतर आता जनजीवन पूर्ववत होत आहे. आता लोक पुन्हा गुंतवणुकीचा विचार करत आहेत. त्यासाठी चांगले व्याजदर आणि सुरक्षित गुंतवणुक कुठे मिळेल. याचा विचार करत असाल तर पैसे गुंतवण्याचा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

सध्याची आर्थीक परिस्थिती पाहता या नव्या लहान योजना आणल्या गेल्या आहेत. यामध्ये गुंतवणुक करत काही वर्षातच लखपती होण्याची सुवर्ण संधी आहे. पोस्टाच्या या योजना कोणत्या आहेत ते आपण पाहूया.

योजनांच्या यादीमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF), आवर्ती ठेव म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट(RD), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) तसेच टाईम डिपॉझिट (TD) या योजनांचा सामावेश आहे.

या योजनावर व्याजदर किती असणार आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत ७.१ टक्के व्याजदर आहे. बचत डिपॉझिट ४ टक्के व्याजदर, एक वर्ष डिपॉझिट ५.५ टक्के, दोन वर्ष ५.५ टक्के, तीन वर्ष ५.५ टक्के, पाच वर्ष ६.७ टक्के पाच वर्ष आवर्ती ठेव ५.८ टक्के, ५ वर्ष SCSS ७.४ टक्के, ५ वर्ष MIC ६.६ टक्के, ५ वर्ष NSC ६.८ टक्के अशाप्रकारे व्याजदर ठेवण्यात आले आहेत.

किसान विकास पत्र यानुसार पोस्ट ऑफिसच्या या खास योजनांमध्ये मॅच्युअरिटी कालावधीनंतर गुंतवणुकदारांना गुंतवणूकीच्या दुप्पट रक्कम मिळते. यासाठी एक हजारापेक्षा जास्त गुंतवणुक करणे गरजेच आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे.

सुकन्या समृद्धी योजना यामध्ये पालक आपल्या मुलींसाठी खातं उघडू शकतात. यांनंतर २१ वर्षांच्या मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. ही रक्कम ९ वर्ष ४ महिन्यांत दुप्पट होते.

महत्वाच्या बातम्या-
पती-पत्नीच्या नावे पोस्टात अकाऊंट उघडा आणि मिळवा दुप्पट फायदा; समजून घ्या पुर्ण स्किम
SBI ने आणली नवीन योजना; ५ हजार रूपयांपासून करू शकता गुंतवणूक
महत्वाची माहिती! चाळीशीनंतर अशी करा गुंतवणूक आणि मिळवा दोन कोटी रुपये
दरमहा २५०० रूपयांच्या गुंतवणुकीवर मिळतील २ लाख रूपये; वाचा कसे…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.