कोरोनापासून बचावासाठी करू नका ‘हे’ घरगुती उपाय; तेच उपाय ठरताहेत जीवघेणे

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी काही निर्बंध लादले आहे. तसेच देशात लसीकरणाला सुरुवात केली आहे.

अशात व्हऑट्सऍपवर आलेला मॅसेज पाहून किंवा लोकांच ऐकून काही लोक घरी राहून कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत आहे. पण ते शरीरासाठी घातक ठरु शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी वाफ घेत आहे. पण हे उपयुक्त ठरवू शकते, याबाबत अजून कुठलाही पुरावा सापडलेला नाही.तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडूनही असा कोणताही सल्ला देण्यात आलेला नाही, असे युनिसेफ दक्षिण आशियातील रिजनल ऍडव्हायझर आणि चाईल्ड हेल्थ एक्सपर्ट्स पॉल रटर यांनी म्हटले आहे.

उलट वाफ घेतल्याने त्याचे वाईट परीणाम होण्याची शक्यता आहे. सतत वाफ घेतल्याने गळा आणि फुप्फुसातील नळीतील टॉर्कीया जळू शकतात. त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर वाईच परिणाम होऊ शकतो.

अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळे मॅसेज फॉरवर्ड होत असतात, त्यातलाच एक म्हणजे गरम पाणी गळ्यासाठी चांगले असल्याचे म्हटले जात आहे. पण कोरोना विषाणू हा नाकातील पॅरानसल सायनसमध्ये ३ ते ४ दिवस राहतो.त्यानंतर तो फुप्फुसांमध्ये पोहचतो. त्यामुळे गरम पाणी पिण्यापेक्षा ४० डिग्रीपर्यंतच्या उष्ण पाण्याची वाफ घेणे चांगले आहे.

तसेच एका आठवड्यापर्यंत वाफ घेण्याचा उपाय हा अशास्त्रीय आहे. अनेक रुग्णांना कोरोनापेक्षा वाफ घेतल्याने जास्त त्रास झाल्याचे दिसून आले आहे. तसेच वाफ घेताना पाण्यामध्ये तेल, युकालिफ्टस ऑईल आणि बाम मिसळले जाते, हे सुद्धा धोकादायक ठरु शकते. असे करणे मेंदूसाठी हानिकारक ठरु शकते, असे सेंट जॉन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे एचओडी डॉ. थॉमस मॅथ्यु यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

देशासाठी रतन टाटांनी घेतला मोठा निर्णय; परदेशातून आयात करणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर
सेल्फी घेतोय म्हणत त्याने भर विमानतळावर घेतला अभिनेत्रीचा किस; पाहा व्हिडिओ
वावर आहे तर पावर आहे! कोवीड सेंटरसाठी शेतकऱ्याने दिली १४ एकर शेती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.