हिंदू देवतांची चित्रे असलेले फटाके विकू नका; मुस्लिम विक्रेत्यांना दिली जातेय धमकी

मुंबई | दिवाळी आठ दिवसांवर आली आहे. नवीन कपडे, फराळ आणि फटाके हे दिवाळीची त्रिसूत्री आहे. यापैकी कपडे खरेदी करण्याची आणि फराळाची तयारी घरोघरी सुरू आहे. तसेच या दोन बाबींची तयारी अंतिम टप्प्यात आल्यानंतर वेध लागतात ते फटाके खरेदीचे.

अशातच मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यामध्ये देवी-देवतांची चित्रे असणाऱ्या फटाक्यांवरुन आता एक नवीन वाद समोर आला आहे.  हिंदू देवीदेवतांची चित्रे असणारे फटाके विकण्यावरुन मुस्लिम दुकानदारांना धमकी दिली जात असल्याचे समोर आले आहे.

याबाबतचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. तसेच या लोकांचे म्हणणे आहे की, फटाक्यांवर हिंदू देवतांची चित्रे असता कामा नये. मात्र, या विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ते फक्त या फटाक्यांची विक्री करतात. या फटाक्यांचे निर्माते आम्ही करत नसल्याचे विक्रेत्यांनी म्हंटले आहे.

याचबरोबर या व्हिडीओमधून भगव्या रंगाचे उपरणे घातलेले काही लोक दुकानांमध्ये जाऊन विक्रेत्यांना फटाक्यांच्या देवतांच्या चित्रावरुन धमकावत असल्याचे दिसतं आहे. या सोबतच फटाके न विकण्याची धमकी देत आहे. तसेच या धमकीने हे दुकानदार घाबरले आहेत.

दरम्यान,  फटाक्यांवर कुणाचं चित्र असावं ही जबाबदारी फटाके बनवणाऱ्यांची आहे. फटाके विकणाऱ्या दुकानदारांची नाही, असे म्हणत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले
बोल्ड सीन्स न देता किंवा अंगप्रदर्शन न करता फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य करते ‘ही’ अभिनेत्री
ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल
रेखाने विनोद मेहरासोबत गुपचूप लग्न केले होते का? वाचा खरं काय..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.