जेलची हवा खायची नसेल तर गुगलवर या गोष्टी कधीच सर्च करू नका

आजकाल सगळेच लोक कोणत्याही गोष्टीसाठी गुगलची मदत घेतात. हे असे सर्च इंजिन आहे ज्याचा वापर लहानांपासून मोठयांपर्यंत सगळेच लोक करतात. सर्चिंगपासून ते शॉपिंगपर्यंत सगळ्या गोष्टी गुगलवर आपल्याला भेटून जातात.

परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल पण गुगलवर काही गोष्टी सर्च केल्या तर तुम्हाला खुप मोठा भुर्दंड पडू शकतो आणि तुम्हाला जेलची हवाही खाऊ लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जसे की गुगलवर कधीही कस्टमर केअर नंबर शोधू नका. असं केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

हॅकर्स आजकाल चुकीचा कस्टमर केअर नंबर गुगलवर टाकून ठेवतात किंवा चुकीची बँक वेबसाईट गुगलवर टाकतात. जर तुम्ही चुकूनही त्यांची मदत घेतली तर तुमचा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि तुमचे नुकसान होऊ शकते.

अनेक वेबसाईटवर कुपन कोडने डिस्काउंट दिला जातो. अशात अनेकजण कुपन कोड गुगलवर सर्च करतात. परंतु गुगलवर कुपन कोड सर्च करणे धोकादायक ठरू शकते. याद्वारे युजरचा डेटा हॅक होऊ शकतो.

काही लोक गुगलवर इमेल आयडी शोधतात. जर तुम्ही असं केलं तर युजर्सचं अकाउंट लीक होऊ शकते. तसेच युजरचा पासवर्डही लीक होऊ शकतो. यामध्ये त्याच्या ईमेल आयडीचा चुकीचा वापर होऊ शकतो. गुगलवर औषधे सर्च करू नका.

कारण गुगलवरची माहिती बरोबर असेलच याची खात्री तुम्ही करू शकत नाही. जर एखादी माहिती चुकली तर औषधाचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तब्येत बरी नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनेकदा मजेत आपण गुगलवर काहीही सर्च करतो पण त्यामुळे तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. गुगलवर चुकूनही बॉम्ब बनविण्याची पद्धत सर्च करू नका. या संबंधी काहीही सर्च केल्यास तुमचा आयपी ऍड्रेस सुरक्षा एजेन्सीकडे पोहोचतो. त्यानंतर तुम्हाला अटक होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या
पंख्याला तीन पाती का असतात? जाणून घ्या यामागचे कारण..
‘शरद पवारांकडून माढा काढून घेतले आता पंढरपूरदेखील राष्ट्रवादीला मिळू देणार नाही’
काका ऋषी कपूरसोबत रोमान्स करण्याचा हट्ट करून बसली होती करिश्मा; त्यांनी दिला ‘हा’ सल्ला
भाजपला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.