तुम्ही जीएसटी भरूच नका, मग ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारावर येतील; मोदींच्या भावाचे व्यापाऱ्यांना आवाहन

ठाणे। गेले वर्ष दीड वर्ष देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात मागील वर्षभर संपूर्ण संचारबंदी करण्यात आली होती. याचा फटका सर्वानाच बसला आहे. मात्र या कालावधीत व्यापाऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

अशातच व्यापाऱ्यांना केंद्राकडून कोणतीही मदत मिळत नाहीय. यासाठीच रेफ्युजी म्हणून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केलं आहे.

प्रल्हाद मोदी हे शुक्रवारी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर टीका करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. सामूहिकरित्या जीएसटी भरायला नकार द्या, केंद्र व राज्य सरकार विरोधात आंदोलन करा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

या कार्यक्रमाला उल्हासनगरमधील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल उल्हासनगरात अनेक व्यापाऱ्यांवर पँडेमिक ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असून त्यामुळे महाराष्ट्रातही हे गुन्हे मागे घेतले जावेत, अशीही मागणी यावेळी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

तसेच या कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी नरेंद्र मोदी यांच्या विषयीचा एक मोठा गौप्यस्पोट केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो.

ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती घर सोडून गेल्यावर होणार मोठा धमाका
..तर तुला भारतात पायही ठेऊ देणार नाही; बीसीसीआयची बड्या क्रिकेटपटूला थेट धमकी
‘पूरग्रस्त भागात ३ दिवसात ११३७ किलोमीटर फिरलो, आता राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार’
“नरेंद्र मोदी मला थांबून म्हणतात, कैसे हो भाई, यालाच म्हणतात सत्ता, पॉवर”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.