आयपीएल २०२२ मध्ये विराट कोहलीची(Virat Kohli) आतापर्यंतची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. विराट कोहली हा बंगळुरूच्या (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) संघातील मुख्य फलंदाज आहे, पण या मोसमात त्याची बॅट एकदम शांत आहे. या आयपीएलमध्ये तो दोनदा बाद झाला आहे.(dont-even-give-luck-to-kohli-express-displeasure-to-god)
त्याचवेळी पंजाबविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तो विशेष काही करू शकला नाही आणि बाद झाला. यानंतर तो स्वत:बद्दल खूपच निराश दिसत होता. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाब किंग्जविरुद्ध १४ चेंडूत २० धावा करून विराट कोहली बाद झाला.
या खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकारही लगावला. त्याला असे खेळताना पाहून तो फॉर्ममध्ये परतत होता, पण त्यानंतर विराट चौथ्या षटकात कागिसो रबाडाचा बळी ठरला आणि राहुल चहरच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना तो खूपच निराश दिसत होता आणि आकाशाकडे बघत रागाने काहीतरी बोलताना दिसला. जणू तो देवासमोर आपली नाराजी व्यक्त करत होता.
Never seen him like this 🥺💔 @imVkohli pic.twitter.com/cikv9lFZnH
— Hemanth Teju (@HemanthTeju17) May 13, 2022
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असताना विराट कोहली आपले दोन्ही हात वर करून आकाशाकडे काहीतरी बोलत आहे. त्याची प्रतिक्रिया पाहून विराटच्या चाहत्यांचीही निराशा झाली. त्याचबरोबर या सामन्यात विराट कोहलीची विकेट मिळाल्यानंतर पंजाब किंग्जनेही(Punjab Kings) ट्विट केले आहे.
Virat Kohli, even we enjoyed while it lasted. ❤️
Hope luck turns on your side soon! 🤞
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022
पंजाब किंग्सने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘विराट कोहली, आम्हीही मजा केली. आशा आहे की नशीब लवकरच तुमची साथ देईल!’ हे ट्विट पाहिल्यानंतर विराटच्या चाहत्यांशिवाय पंजाब किंग्जच्या संघालाही विराट कोहलीने लवकर फॉर्ममध्ये परतावे असे वाटत होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. जिथे संघाने आरसीबीला ९ गडी गमावून २१० धावांचे डोंगरासारखे लक्ष्य दिले. जॉनी बेअरस्टोने २९ चेंडूत ६६ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी लियाम लिव्हिंगस्टोनने ४२ चेंडूत ७० धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात १५५ धावाच करू शकला आणि पंजाबने ५४ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात बेयरस्टोला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले..
IPL चे पाकिस्तान कनेक्शन झाले उघड, सट्टेबाजांवर BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई
घराच्याघरी मडक्यात उगवा मशरूम आणि कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
घटस्फोट होताच सोहेलच्या अफेअरच्या बातम्यांनी घेतला पेट, ‘या’ अभिनेत्रीमुळे मोडले २४ वर्षांचे नाते?