सावधान! ‘हे’ पदार्थ खात असाल, तर होऊ शकतात तुम्हाला गंभीर आजार; आजच करा बंद

कोरोनामुळे सगळेच आपल्या आहारात बदल करताना दिसून येत आहे. प्रत्येकजण आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकं हेल्थी फुड खात आहे.

असे असले तरीही आपण जीभेला असलेले चोलचे पुरवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ म्हणजेच मैद्याचे, मसालेदार, पदार्थ खात असतो. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते पण आरोग्यसाठी ते काही फायद्याचे ठरलेले दिसत नाही. उलट हे पदार्थ आरोग्याला धोकादायकच असतात.

साखर- तसेच काही लोकांना साखरेचे पदार्थ खुप आवडतात, पण त्यानेही शरीराची हानी होत असते. साखरेचे पदार्थ कमी केले तर आपोआपच काही आजार कमी होत असतात. साखरेत भरपुर कॅलरी असल्याने इम्युलॉजिकल फंक्शन खराब होऊ शकते.

मीठ- जागतिक आरोग्य संघटनेने रोज ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे टाळावे, असे सांगितले आहे. पण अनेकांना खारवलेले पदार्थ, बेकरीचे प्रोडक्ट, चिप्स, खायला आवडत असतात, ज्यामध्ये भरपुर मीठ असते. पण या पदार्थांमुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. रोग प्रतिकारशक्ती जर कमी झाली आणि बॅक्टेरीयाचा शरीरावर हल्ला झाला, तर शरीराची लढण्याची तयारी नसते, त्यामुळे मीठ कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.

तळलेले पदार्थ- बाजारात मिळणारे तळलेले पदार्थ लोकांना खुप आवडत असतात. फ्रेंच फ्राईज, समोसे, वडे, सँडविच असे तळलेले पदार्थ लोकं मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. पण एका अभ्यासानुसार, तळलेल्या पदार्थांमुळे हार्ट अटॅकचा आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

कॅफिन- आपल्याला बऱ्याचदा चहाप्रेमी किंवा कॉफी प्रेमी दिसून येतात. पण त्यामुळे झोपेवर परीणाम होतो, अपुऱ्या झोपेने रोग प्रतिकारशक्ती कमी होते. दिवसातून दोनपेक्षा जास्तवेळा चहा, कॉफी पिण्याची सवय असेल, तर ताबा ठेवला पाहिजे. तसेच संध्याकाळी किंवा रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिऊ नये.

मद्यपान- जास्त मद्यपान केल्यानेही रोगप्रतिकारशक्ती कमी होते. मेयो क्लिनिकच्या मते, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच अनेक आजार होत असतात.तसेच यकृत आणि मुत्रपिंडाचे नुकसान होते. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल, तर हे पदार्थ टाळले पाहिजे.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेसच्या सरकारमुळेच भारतातील पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे; केंद्रीय मंत्र्याने सांगितले कारण
आल्याचे ‘अशा’ पद्धतीने रोज सेवन केल्याने होतात आश्चर्यकारक फायदे, वजन होईल झटक्यात कमी
विकृतीचा कळस! भल्या मोठ्या किंग कोब्राला पकडले आणि त्याच्यावर उभे राहून…, पहा भयानक व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.