सावधान! लसीकरणानंतर मद्यापान करताय, आधी ही बातमी वाचा

 

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे भारतात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता लसीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरीकाला लस देण्यास सुरुवात झाली आहे.

आता लस घेण्याआधी किंवा लस घेतल्यानंतर कोणते नियम पाळावे याबाबत अजूनही नागरीकांमध्ये संभ्रम आहे. अशात लस घेणाऱ्यांना मद्यपाणाच्या सेवनाबाबत संभ्रम निर्माण होताना दिसून येत आहे.

अशात लसीकरणाआधी तसेच लस घेतल्यानंतर किती दिवस मद्यपान करावे नाही असे प्रश्न मद्यप्रेमींच्या मनात निर्माण होत आहे, पण याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही, असे असताना आता तज्ज्ञांनी मद्यपानाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

लसीकरणानंतर मद्यपान टाळलेले बरे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर प्रत्येक नागरीकाने अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण लसीकरणानंतर एक दोन दिवस अशक्तपणा, ताप येणे, अशी लक्षणे लस घेणाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.

तसेच ज्या लोकांना उच्च रक्तदाब, मधूमेह आहे, अशा नागरीकांनी मद्यपान करणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे लसीकरणानंतर मद्यपान करु नये, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच लसीकरणानंतर मद्यपानाबाबत अनेक चुकीची माहिती पोहचत आहे, त्यामुळे अनेक नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होत असल्याचेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दरम्यान, मद्यपानाचे शरीरावर अनेक विपरीत परिणाम होत असतात, अनेकदा रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते, त्यामुळे लसीकरणाआधी तसेच लसीकरणानंतर कमीत कमी दोन दिवस तरी मद्यपान टाळल्यास लसीचा शरीरावर चांगला प्रभाव पडू शकतो, असे डॉ. भुपेंद्र पाटील असे यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.