जेवणानंतर लगेचच ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम

जेवण झाल्यानंतर अनेकांना चहा पिण्याची किंवा फळे खाण्याची सवय असते पण हे साफ चुकीचे आहे. तुम्ही तुमच्या शरीराचे नुकसान करत आहात. काही गोष्टी अशा असतात ज्या जेवणानंतर करायच्या नसतात. आपण कोणाच्याही सांगण्यावरून या गोष्टी करतो पण आधी पडताळणी करणे महत्वाचे आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे जेवणानंतर साधारण १५-२० मिनिटांनी पाणी पिणे कधीही चांगलं असते. जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने पचनक्रियेवर परिमाण होतो. कारण जेवताना किंवा लगेच जेवणानंतर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रिया प्रभावित होते.

काही जणांना सवय असते की ते जेवल्यानंतर चहा पितात. पण हे करणे चुकीचे आहे. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ल असते. यामुळे प्रथिनांच्या पचनावर वाईट परिणाम होऊन प्रथिनांची पचनक्रिया प्रभावित होते. त्याऐवजी जेवल्यानंतर दूध पिणे कधीही चांगले.

झोप ही शरीरासाठी महत्वाची आहे पण जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅस व आतड्यांच्या संक्रमणाची शक्यता असते. म्हणूनच जेवण झाल्यानंतर शतपावली केल्यास त्याचा अन्न पचनासाठी खूप फायदा होतो आणि झोप चांगली लागते.

फळे खाल्लेली चांगली असतात पण जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळे नेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवी. त्यातही सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणे सर्वाधिक फायदेशीर आहे. जेवल्यानंतर काही तासांनी फळे खा.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा. आणि ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून यात आम्ही कसल्याही प्रकारचा दावा करत नाही. तज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले ठरेल.

महत्वाच्या बातम्या

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; भावना व्यक्त करताना अश्रू अनावर, म्हणाल्या…

रोहित पवारांच्या ‘त्या’ फोटोंनी सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; भाजपनेही केली जहरी टीका..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.