गाडी विकत घेऊ नका कारण टाटा स्वतः १५ लाखांची नेक्सन देताहेत भाड्याने, तेही फक्त..

दिल्ली | आपली स्वतःची नवीकोरी गाडी असावी असं वाटत असतं. पण हे स्वप्न सत्यात कधी उतरेल याचीच ते वाट बघत असतात. कारण आजच्या महागाईमुळे सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यात गाडी कशी येणार असा प्रश्न पडतो.

पण आता टेंशन घेऊ नका कारण तुमचे हे स्वप्न आता टाटा मोटर्स पूर्ण करणार आहे. त्यानुसार टाटा मोटर्सची १५ लाखांची कार तुम्ही भाड्याने घेऊ शकता. यासाठी कंपनी स्वतः कार भाड्याने देत आहे.

वास्तविक, आपल्या इलेक्ट्रिक कार Nexon EVसाठी (नेक्सन ईव्ही) टाटा मोटर्सने सब्सक्रिप्शन योजना सुरू केली आहे. याबाबत कंपनीने सांगितले आहे की, ही योजना काही ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

 

काही लोकांना काही काळापुरते एका शहरात वास्तव करायचे असते आणि त्यांना त्या दरम्यान प्रवासासाठी गाडीची गरज असते. पण एवढ्या कमी काळासाठी कार खरेदी करण्याची त्यांची इच्छा नसते.

सध्या १८ महिने, २४ महिने आणि ३६ महिन्यांसाठी ही योजना कंपनीने सुरू केली आहे. जर ग्राहकांना टाटा नेक्सन इलेक्ट्रॉनिक कार १८ महिन्यांसाठी भाड्याने हवी असेल तर त्यांना महिन्याला ४७ हजार ९०० रुपये द्यावे लागतील.

२४ महिन्यांसाठी पाहिजे असेल तर दरमहा ४४ हजार ९०० रुपये भाडे द्यावे लागेल. तर ३६ महिन्यांसाठी हवी असेल तर दरमहा ४१ हजार ९०० रुपये द्यावे लागतील. सबस्क्रिप्शन संपल्यानंतर तुम्ही वाढवून घेऊ शकता किंवा कार परत देऊ शकता.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.