पतंजलीने जे कार्य केले त्याचे कौतुक करू नका, परंतु तिरस्कार तरी करू नका- रामदेव बाबा

देहरादून | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगगुरु रामदेव बाबा यांनी गेल्या आठवड्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिले आयुर्वेदिक औषध शोधल्याचे जाहीर केले होते.

मात्र, त्यानंतर लगेच संध्याकाळी केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. या सर्व प्रकरणावर आज रामदेव बाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

पतंजलीने जे काम केलं त्याची स्तुती करावी, असा माझा आग्रह नाही. आम्हाला सत्काराची अपेक्षा नाही. मात्र तिरस्कार तरी करु नका, असं रामदेव बाब यांनी म्हंटले आहे.

पतंजलीने केलेल्या प्रयत्नात तीन दिवसात ६९ टक्के आणि सात दिवसात १०० टक्के रुग्ण बरे झाले. त्याची सविस्तर माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे. असे स्पष्टीकरण रामदेव बाबा यांनी दिले आहे.

‘कोरोनिल’ औषधाच्या प्रयोगासाठी ज्यांची परवानगी घ्यायची होती, त्या सर्वांचे प्रमाणमंत्र आम्ही आयुष मंत्रालयाकडे पाठवले आहे.

याशिवाय पतंजलीच्या प्रयत्नाचे आयुष मंत्रालयाने कौतुकही केले आहे. असे देखील रामदेव बाबांनी यावेळी सांगितले.

मात्र, केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. या बंदीनंतर रामदेव बाबा यांच्यावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.