डोनाल्ड ट्रम्प मारुती 800 कारने येणार हिमाचल प्रदेशमध्ये; ई पास पाहून पोलीस पण चक्रावले

हिमाचल प्रदेश मधून एक घटना समोर आली आहे. शिमला प्रशासनाकडून देण्यात आलेली दोन्ही पास सध्या चांगलीच चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन आणि डोनाल्ड ट्रम्प यांना दोघांना हे पास देण्यात आलेले आहेत.

हे दोन्ही पास शिमला प्रशासनाकडून देण्यात आलेली आहेत. या दोन्ही पासवरून जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधी पक्षांनी पण सरकारला धारेवर धरले आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने बाहेरून येणाऱ्यासाठी ई रजिस्ट्रेशन सक्तीचे केले होते. आता अमिताभ बच्चन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची नावे चर्चेत आहेत.

ते दोघेही शिमल्यामध्ये येणार आहेत. त्यांच्या पासची व्हॅलिडीटी सात मे लिहिली आहे. देण्यात आलेल्या माहितीनुसार सात मेच्या काळात डोनाल्ड ट्रम्प चंदिगड वरून शिमला मधील सुनी येथे येत आहेत. यासाठी आवश्यक सेवा म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प येणार असलेल्या गाडीवर चंदीगड चा नंबर असून ती गाडी मारुती 800 आहे. ते चंदीगडवरून शिमलापर्यंत या गाडीमध्ये प्रवास करणार आहेत.

दोन्ही ई पास सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. विरोधकांनी याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे हिमाचल प्रदेश पोलिसांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, “फेक ई पास बनवले गेल्याची महियी पोलिसांना मिळाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.