काय सांगता; डॉमिनोज पिझ्झा कंपनीच्या कोट्यवधी ग्राहकांचा डेटा झाला लीक

तुम्ही जर रोज डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाण्यासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड असलेल्या डॉमिनोज पिझ्झा कंपनीच्या ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे.

सुरक्षा तज्ज्ञांनी यासंबंधातील माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डार्क वेबवर तब्बल १८ कोटी ऑर्डर्सचा डेटा हॅकर्सने प्रसिद्ध केला आहे. यात ग्राहकांची खाजगी माहिती पण समाविष्ट असल्याचे समजते आहे.

यामध्ये ग्राहकांचे फोन नंबर, इमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि कार्डच्या माहितीचा समावेश आहे. विशेषतः जे ग्राहक डॉमिनोज कडून कायम ऑर्डर करत असायचे त्यांचा यात जास्त करून समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

याबाबतची माहिती ट्विटरवर समजली आहे. सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. १८ कोटी ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की जे ग्राहक सातत्याने डॉमिनोज कडून ऑर्डर करून घ्यायचे त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र डॉमिनोज इंडियाने हे वृत्त खोडून लावले आहे.

त्यांनी म्हटले आहे की आमच्याकडून कोणत्याही ग्राहकांचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक करण्यात आलेला नाही. डॉमिनोज ही जगातील प्रसिद्ध पिझ्झा कंपनी असून २८५ शहरांमध्ये तिचे आउटलेट्स आहेत. ग्राहकांच्या डेटा लिक्समधून हॅकर्स कोट्यवधी रुपये कमवत असल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्या .
चाहत्यांनी विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं; सुर्यकुमारने दिली भन्नाट उत्तरं

मलायकाचं वय, घटस्फोट आणि मुलाबाबत व्यक्त झाला अर्जुन कपूर, नात्याबद्दल खुलासा करताना म्हणाला…

VIDEO: सनी लिओनीचा गाऊन इतका फिट झाला की, चैन लावणे झाले होते अवघड मग पहा पुढे काय झाले….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.