सोशल मीडियावर(Social Media) आपण अनेक जोडप्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ पाहतो. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते जोडपं एकमेकांना सार्वजनिक ठिकाणी किस करत आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या व्हिडिओमधील जोडप्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.(dombivali railway station video viral )
मिळालेल्या माहितीनुसार, “या जोडप्याचे दोन व्हिडिओ व्हायरल(Viral) झाले आहेत. हे व्हिडिओ डोंबिवली आणि सीएसएमटी या दोन रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरचे हे व्हिडिओ आहेत. एक व्हिडिओ डोंबिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरचा आहे. एक प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आहे. दुसरा व्हिडिओ सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरचा आहे.
या व्हिडिओमध्ये हे जोडपं प्लॅटफॉर्मवर(Platform) किस करत आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल रेल्वे कॅंटीनमध्ये काम करणाऱ्या एक व्यक्तीने माहिती दिली आहे. या व्यक्तीने सांगितले की, “या जोडप्यावर काही प्रवाशी संतापले होते. हे जोडपं कॉलेजमध्ये शिकत असल्याचं आम्हाला वाटते. हे जोडपं सार्वजनिक ठिकाणी किस करत होतं. त्यावेळी काही प्रवाशांनी त्यांना विरोध केला आणि तेथून जाण्यास सांगितले.”
सीएसएमटी स्टेशनवरील प्रवाशाने हा प्रसंग पाहिला. त्यानंतर त्याने त्या जोडप्याला खूप सुनावले. या प्रसंगाबद्दल माहिती देताना प्रवासी म्हणाला की, “आजच्या पिढीला काय म्हणावे? या जोडप्याला लाज वैगेरे काही नाही. सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य पाहून इतरांना लाज वाटते, पण हे जोडपं त्याचा आनंद घेत आहे.”
रेल्वे पोलीस अधिकारी अनिल शेळके यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही व्हिडिओ पाहिला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करणे चुकीचे आहे. आम्ही एनसी नोंदवली आहे आणि आम्ही पुढील तपास करत आहोत. अद्याप आम्हाला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळू शकलेलं नाही”, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
लोक या व्हिडिओतील जोडप्याला ट्रोल करत आहेत. तसेच काही लोक जोडप्याच्या बाजूने देखील बोलत आहेत. या जोडप्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून अजून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या जोडप्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी लोक करत आहेत. सोशल मीडियावर लोक या जोडप्यांच्या विरोधात कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते, वाचा ‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेत्रीची यशोगाथा
NEXON नंतर टाटा बाजारात आणणार ‘ही’ दमदार कार, CRETA आणि VENUE सारख्या कार पडणार फिक्या
महिलेला मधलं बोट दाखवणं पडलं महागात; तरुणाला घडली आयुष्यभराची अद्दल, वाचा सविस्तर






