VIDEO: गाडी पार्क करण्यासाठी ड्रायव्हरने घेतली कुत्र्याची मदत; पहा कुत्र्याने कशी केली गाडी पार्क

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. रोज लाखोंच्या संख्येने अपलोड होणाऱ्या व्हिडिओंमध्ये काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतात. अनेक व्हिडिओ हे लोकांना हसवणारे पण असतात, तर अनेक व्हिडिओ लोकांना आश्चर्याचा धक्का देणारे असतात.

आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर होत असून हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये एका माणसाने चक्क एका कुत्र्याच्या मदतीने गाडी पार्क केली आहे.

कुत्रा माणसाचा अतिशय जवळचा मित्र समजला जातो. तसेच त्याच्या हुशारीच्या अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिल्या असतील आता असाच एक व्हिडिओ सध्या सगळ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

एका कुत्रा एका गाडीच्या मागे उभा असून तो गाडी चालकाला गाडी पार्क करतांना मदत करत आहे. या व्हिडिओमध्ये तो गाडी चालकाला इशारा देताना दिसत आहे. तसेच गाडी जेव्हा फुटपाथजवळ येताच तो तिला थांबण्याचा इशाराही करताना दिसत आहे.

एखाद्या नव्या ड्रायव्हरसाठी गाडी पार्क करणे खुप कठिण काम असते. पण त्या कुत्र्याच्या मदतीने त्या चालकाला गाडी पार्क करणे खुप सोपे झाले आहे. गाडी पार्क करताना कुत्रा एखाद्या सेंसरप्रमाणे काम करताना दिसत आहे. हा कुत्र्याची ही कामगिरी पाहून अनेक लोक कुत्र्याचे कौतूक करत आहे.

ह्युमर अँड ऍनिमल या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी भुंकणारं सर्वोत्कृष्ठ सेंसर, कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून २८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ आचापर्यंत बघितला आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपने मराठ्यांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यावर तोडगा सांगावा; समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजीराजे आडवा येईल
मराठा आरक्षणासाठी मोदींना चारवेळा पत्र दिले, पण त्यांनी अजूनही भेटीसाठी वेळ दिली नाही-संभाजीराजे
बाबा रामदेव उतरले ई कॉमर्स क्षेत्रात; देणार फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला टक्कर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.