कुत्र्याची चेष्टा करणं तरुणाला भोवलं, अतिहुशार मुलाचा कुत्र्याने चावला हात, व्हिडीओ व्हायरल

मुंबई। अनेक लोक आपल्या जिवापेक्षा प्राण्यांवर जीव लावत असतात. त्याला एखाद्या माणसाप्रमाणे प्रेम करतात, त्यांच्याशी खेळतात, मस्ती करतात. त्यामुळे प्राणी देखील आपल्या मालकाला जीव लावतात.

मात्र काही लोक असे असतात जे प्राण्यांची मस्करी करत असतात. त्यांना विनाकारण त्रास देतात, त्यांना मारतात. तसेच त्यांचे हाल देखील करतात. मात्र प्राणी योग्य वेळ आल्यावर त्या व्यक्तीचा बरोबर बदला घेतात.

असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यात एक मुलगा कुत्र्याची मस्करी करत आहे, मात्र त्या कुत्र्याने त्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर haryanvi_chaskaa या पेजने शेअर केला आहे. सोबतच या व्हिडीओला, ‘हां भाई आ गया स्वाद’ असं कॅप्शन दिलं आहे. या

व्हिडीओमध्ये एक मुलगा कुत्र्याला ब्रेड चारत असतो. दोन ब्रेड चारल्यानंतर मजेसाठी तो मुलगा कुत्र्याचा कान ओढू पाहतो. ज्यामुळे अचानक कुत्र्याला राग अनावर होतो आणि कुत्रा चिडून मुलाचा हातच जबड्यात पकडतो.

बरीच मेहनत करुन मुलाला आपला हात कुत्र्याच्या तावडीतून सोडवावा लागतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्या मुलावर चांगलीच टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

VIDEO: धक्कादायक! बाप मदतीसाठी ओरडत राहिला, लोकांनी केले १३ वर्षीय मुलीचे अपहरण आणि….

..म्हणून मेहमूदने सगळ्यांसमोर मनोज कुमारच्या कानाखाली वाजवली होती

डेल्टा + चा धोका! राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार

ओ तेरी! महिलेनं घातलं 264 झूम मिटिंगला एकच शर्ट, पण शेवटच्या दिवशी झालं असं की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.