याला म्हणतात ईमानदारी! कुत्र्याने पाण्यात उडी मारून वाचवला चिमुकलीचा जीव, पहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाळीव कुत्र्याने केलेल्या कृतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्राण्यांना जीव लावला तर ते आपल्यासाठी जीवही देतील हे या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अनेक लोकांना आपल्यासोबत प्राणी पाळण्याची आवड असते. ते या प्राण्यांना खूप जीव लावतात. अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे घरामध्ये ठेवतात. पण शेवटी प्राणी ते प्राणीच आहेत असेही काही लोक म्हणतात. पंरतु या व्हिडीओत पाळीव कुत्र्याने लहान मुलीची कुटुंबातील सदस्यप्रमाणे काळजी घेतल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओला जबरदस्त पसंती मिळते आहे. व्हिडीओत दिसते आहे की, एक लहान मुलगी नदीच्या किनारी आहे. ही मुलगी तिचा नदीच्या पाण्यात पडलेला चेंडू घेण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ती पाण्यात जाण्यासाठी निघते. मात्र इतक्यात त्याठिकाणी जवळच बसलेल्या कुत्र्याने ही गोष्ट पाहिली.

चिमुकली पाण्यात जात असल्याचे पाहाताच कुत्रा तिच्याजवळ पळत जातो. आणि तिला मागे खेचतो. मुलीला मागे खेचल्यानंतर कुत्रा स्वत: पाण्यात जाऊन या मुलीसाठी चेंडू घेऊन येतो. यामुळे या कुत्र्याचे सोशल मीडियावर प्रंचड कौतुक होत आहे. सोशल मीडिया व्हायरल, व्हायरल व्हिडिओ, पाळीव प्राणी, ईमानदार कुत्रा, लहान मुलगी, मुलीची काळजी

महत्त्वाच्या बातम्या-
छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतलेल्या सयाजी शिंदे यांनी आईला दिली ‘ही’ अनोखी भेट
कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले आनंद महिंद्रा; पहा व्हिडीओ
सुर्वे काकांची डब्बू अंकलला टक्कर, ‘खाय के पान बनारसवाला’ गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.