Share

जेवण केल्यावर तुमचेही पोट फुगते का? ‘हे’ पदार्थ असू शकतात यामागचे कारण, आजच खाणे टाळा

काही लोक अनेकदा पोट फुगण्याच्या (Bloating) समस्येने त्रस्त असतात. ब्लोटिंग म्हणजे पोट आणि आतड्यांमध्ये गॅस तयार होणे. हे कोणत्याही रोगामुळे होत नाही तर कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन, अति खाणे, मासिक पाळी येणे, बद्धकोष्ठता इत्यादीमुळे देखील होऊ शकते. आजकालची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, बसणे, पोटात गॅस निर्माण होणे, पचनसंस्थेचे अयोग्य कार्य यामुळेही पोट फुगण्याची समस्या वाढते.(Does your stomach swell after eating?)

पोट फुगल्यामुळे पोट गच्च वाटणे, भूक न लागणे अशी समस्या असू शकते. पोटदुखी, अस्वस्थता, गॅस, ढेकर येणे या समस्यांमुळे तुम्हाला वारंवार पोट फुगल्याचा त्रासही होऊ शकतो. काहीवेळा काही खाद्यपदार्थ पोट फुगण्याची समस्या वाढवतात ज्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.

फुगण्याची समस्या वाढवणारे पदार्थ:
ब्रोकोली, फ्लॉवरचे सेवन कमी करा, कारण यामुळे पोट फुगण्याची समस्या देखील होते. या भाज्या लवकर पचत नाहीत. ज्या लोकांची पचनशक्ती कमकुवत असते, त्यांना या भाज्या पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे पोट फुगते.

तळलेले पदार्थ, जंक फूड, पॅक केलेले पदार्थ किंवा बाहेरील खाद्यपदार्थ, सोडा, कार्बोनेटेड पेये तुम्ही सतत जास्त सेवन करत असाल तर मलविसर्जनाची समस्या अधिक असते. अशा गोष्टी जड असतात, ज्यामुळे पोटात जाऊन गॅस होतो, जळजळ होते. जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर जास्त सफरचंद खाऊ नका. सफरचंद हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे, पण त्यात असलेले फ्रुक्टोज, फायबर गॅस वाढवते आणि त्यामुळे पोट फुगते.

लसूण ही आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी औषधी वनस्पती किंवा मसाला आहे. अनेकदा लोक रिकाम्या पोटी लसूण खातात, पण जर तुम्हाला गॅस बनण्याची किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तर लसूण खाऊ नका. त्यात असलेले फ्रक्टन्स फुगणे, गॅस वाढवतात. सोयाबीन, मसूर यांसारख्या शेंगांच्या अतिसेवनामुळे देखील पोट दुखू शकते. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे सूज येते.

जर तुम्हाला शेंगांचे आरोग्यदायी फायदे मिळवायचे असतील तर एकाच वेळी जास्त बीन्स, मसूर खाऊ नका. फायबर पचनसंस्थेचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यास मदत करते. तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, जेणेकरून तुम्ही जास्त खाणे टाळता. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जास्त गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या टाळायची असेल तर फायबरचे सेवन हळूहळू वाढवा.

महत्वाच्या बातम्या-
युद्ध नको बुद्ध हवा, प्रख्यात लेखकाची फेसबुक पोस्ट चर्चेत, लोकांना दिला मोलाचा संदेश
शशी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, पत्नीबद्दल म्हणाले असं काही की भावनिक झाले लोक
मलिकांना अटक झाल्यावर थयथयाट करणारे एसटीचा संप मिटवण्यासाठी काहीच का करत नाहीत?
अखेर शालिनी हत्या प्रकरणाचा झाला उलगडा, प्रियकरानेच केली होती हत्या, कारण ऐकून पोलिसही चक्रावले

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now