सुशांतला भूत दिसायचे का..?; सीबीआयच्या टीमने ‘या’ तिघांची केली चौकशी

मुंबई | सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणातील सत्य समोर आले नाही.

कारण, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

सीबीआयच्या टीमने या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू केला आहे. सीबीआयच्या टीमने सुशांतच्या घरी जाऊन मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम पुन्हा निर्माण केला आहे. यावेळी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह आणि घरी काम करणारा दीपेश सावंत यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे.

सुशांतचा मृत्यू झाला त्यावेळी घटनास्थळी पोलीस पोचण्याआधी उपस्थित असलेल्या व्यक्तींची चौकशी सध्या सीबीआय करत आहे. सुशांतला भूत दिसायचे का? याबाबत सीबीआय पथकाने या तिघांचीही कसून चौकशी केली आहे.

यादरम्यान, सिद्धार्थ पिठाणी आणि नीरजसिंह यांच्या जबाबात विसंगती समोर आली आहे. त्यामुळे, सीबीआयच्या पथकाने त्यांची पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आहे. त्यांच्याबरोबर सुशांतच्या घरी काम करणारा दीपेश सावंत याचीही चौकशी सुरू आहे.

सीबीआयने सुशांतच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी सुशांतचा मृतदेह हा कोणत्या दिशेला होता? त्याचे हात आणि पाय कशा पद्धतीने होते? या सर्व गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे.

दरम्यान या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.