VIDEO: कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं; कोरोना रुग्णही मनसोक्त थिरकले

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र मेहनत घेत आहे. तसेच डॉक्टर रुग्णांना धीर देण्याचे काम पण करत आहे.

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये डॉक्टर रुग्णांना धीर देताना दिसून येत आहे. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये डॉक्टर रुग्णांना सुशांतच्या एका चित्रपटातलं गाणं गाऊन धीर देत आहे.

या व्हिडिओमध्ये सुशांत राजपुतच्या केदारनाथ चित्रपटातल्या नमो नमो हे गाणे म्हणत रुग्णांना धीर देण्याचे काम करत आहे. पीपीई कीट घालून हे आरोग्य कर्मचारी हे गाणे गात आहे. तसेच या गाण्यावर काही कर्मचारी थिरकतही आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही कर्मचारी गिटार वाजवतानाही दिसत आहे. या गाण्यामुळे रुग्ण सुद्धा आपले दु:ख विसरले आहे. कोरोना झालेल्या काही रुग्णांना मानसिक त्रास होत, त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी डॉक्टर पुढाकार घेताना दिसून त्यांचे मनोरंजन करत आहे.

दरम्यान, डॉक्टर रुग्णांचा जीव वाचण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करताना त्यांचा तणाव दुर करणे हा पण एक उपचाराचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे डॉक्टरांसोबतच आरोग्य कर्मचारीही वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णांचे मनोरंजन करुन त्यांचा तणाव दुर करण्याचे काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

VIDEO: सुई पाहून तरुणी चांगली घाबरली; आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरत तिला दिली लस
भुख लागली असेल बिनधास्त खा, पैसे देऊ नका; सोशल मीडियावर तमिळनाडुच्या फळविक्रेत्याची चर्चा
चाहत्यांनी विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं; सुर्यकुमारने दिली भन्नाट उत्तरं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.