शाब्बास! डॉक्टरांनी ९ दिवसात केल्या १३० डिलिव्हरी, सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई| सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ रोज व्हायरल होत असतात. सोशल मिडिया युजर्स यावर आपल्या प्रतिक्रिया देत असतात. सोशल मिडियावर अनेक मजेदार गोष्टी पाहायला मिळतात. असाच एक डॉक्टरांचा डान्स व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता सहा महिला डॉक्टर वेगवेगळ्या कलरचे स्क्रब घालून एक एका इंग्रजी गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

 

हा व्हिडिओ वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर निलाश्मा सिंघल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी त्याच्यांसोबत डान्स करणाऱ्या पाच ज्यूनियर डॉक्टरांना टॅग केला आहे. व्हिडिओला डॉक्टर सिंघल यांनी ‘माय टॅलेंटेड इंटर्न्स’ आणि ‘मेरी प्यारी ज्यूनियर्स’ असं कॅप्शन दिलं आहे.

डॉक्टर नीलाश्मा सिंघल यांनी सांगितले की, आम्ही ९ दिवसात १३० डिलिव्हरी केल्या आहेत. त्याच्या आनंदामुळे आम्ही सेलिब्रेशन करत आहोत. तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे.  कमेंट्स करत डॉक्टरांच्या ग्रूपचं कौतूक केलं आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओची चर्चा रंगू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-
चित्रा वाघ यांच्या पतीविरुद्धच्या कारवाईला राजकीय रंग; सरकारविरुद्ध राहिल्याचा फटका
हौसेला मोल नाय! पुण्यात छापली चक्क सोन्याची लग्नपत्रिका, पत्रिकेची किंमत आहे तब्बल…
‘या’ प्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल; वाचा सविस्तर व्हिडीओ: भयाण आग लागलेल्या इमारतीतून आईने मुलांना ‘असं’ वाचवलं, पहा श्वास रोखणारा थरार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.