डॉक्टरांची सीबीआयकडे कबुली; मुंबई पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी घाई केली, त्यामुळे..

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र अजूनही या प्रकरणातील सत्य जगासमोर आले नाही. काही लोकांच्या मते ही आत्महत्या आहे, तर काहींनी ही हत्या असल्याचे सांगितले आहे.

अनेक कलाकारांनी तसेच मोठ्या राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे.

हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यामुळे या घटनेचा तपास परत सुरुवातीपासून केला जाणार आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यापासून अनेक धक्कादायक आणि नवीन सत्य समोर आले आहे.

सीबीआयने तपास केला असता, सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतचे पोस्टमॉर्टम करणार्‍या डॉक्टरांची कसून चौकशी करण्यात आली होती. या चौकशी दरम्यान डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे.

मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यास सांगितल्यामुळे हा रिपोर्ट देण्यात घाई झाली. अशी कबुली पोस्टमॉर्टम करणार्‍या डॉक्टरांनी दिली आहे.

सीबीआयच्या टीमने पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यात इतकी घाई का केली? असा प्रश्न सीबीआयने विचारला असता, डॉक्टरांनी थेट मुंबई पोलिसांचे नाव घेतले.

मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरूनच आम्ही रात्री उशिरा सुशांतचे पोस्टमॉर्टम केल्याचे डॉक्टरांनी सीबीआयला सांगितले. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ प्राण्यांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका! अखेर शास्रज्ञांनी शोधून काढलेच..

-अनलॉक ४; १ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात ‘या’ सर्व गोष्टी

-राज्यातंर्गत वाहतूकीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल- अनिल देशमुख 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.