बारामतीच्या डॉक्टरांनी शोधले कोरोनावर प्रभावी औषध, आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

बारामती । कोरोनाने सर्व देशात हाहाकार उडवला आहे. परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. ऑक्सिजन बेड्स मिळत नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत. असे असताना बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात एक औषध शोधल्याचा दावा केला आहे.

या डॉक्टरांनी हळद आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. यातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतो. कोरोनामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम टाळता येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

हळदीमध्ये करक्युमीन हा पोषक घटक व काळी मिरी यांचे मिश्रणातून हे औषध बनवण्यात आले आहे. डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेले संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

यांच्या मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे ही लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले. हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी ७ ते २८ दिवस होता तर करक्युमीन घेतलेल्या रुग्णांचा ५ ते  १० दिवस होता. या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली.

तसेच या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला आहे. यामध्ये कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, हे सिध्द झाले आहे. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्या, असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे.

याची कोरोनावर मदत होऊ शकते, याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनाद्वारे मांडण्यात आला आहे. बारामती येथील सार्वजनिक रुग्णालयात इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची ट्रायल १४० रुग्णांवर घेण्यात आली. यामुळे आता आशा वाढल्या आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात अत्यावश्यक प्रवासासाठी आता लागणार ई-पास; असा काढा ई-पास

घाबरू नका! वय ८८, एचआरसीटी स्कोअर २५, मधुमेहाचा आजार; तरीही सहज बरे झाले आजोबा

वुमन पावर! शिक्षण फक्त चौथी पास, वय ५२ वर्षे, वार्षिक उलाढाल तब्बल ३ कोटी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.