आर्याला असं अडकवणार डॉक्टर स्वतःच्या जाळ्यात; देवमाणूस मालिकेत मोठा ट्विस्ट

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका लोकप्रिय मालिकांमधील एक आहे. ‘देवमाणूस’ मालिकेला अनेक रंजक वळण आलेली पाहायला मिळाली. सध्या ही मालिका भरपूर चर्चेत आहे.  तसेच यातील कलाकारांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

‘देवमाणूस’ मालिकेने आता विलक्षण वळण घेतले आहे. या मालिकेत एसीपी दिव्या सिंगची काही दिवसांपूर्वी एन्ट्री झाली आणि ही दिव्या सिंग डॉ.अजितला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यासाठी ती वेगवेगळी धडपड करत आहे.

डॉ. अजितकुमार आणि डिंपलच लग्न चालू असतानाच, एसीपी दिव्या सिंग अजितला लग्नाच्या भर मांडवातून सरळ पोलीस स्टेशनमध्ये नेते. मालिकेमध्ये सध्या अजित स्वतःची केस स्वतःच लढत आहे तर सरकारी वकील म्हणून आर्या देशमुख हिची निवड झाली आहे.

सरकारी वकील आर्या अजितला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे भर देत आहे. वेळप्रसंगी अजितबरोबर वादविवाद करायला सुद्धा सज्ज आहे. तर दुसरीकडे डॉ.ला वाचवण्यासाठी डिंपलचा जीव खाली वर होत आहे.

आता वकील देवीसिंगला शिक्षा करण्यात यशस्वी होईल का? की तीही देवीसिंगच्या जाळ्यात अडकेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. आणि पुढे काय होणार याची तीव्र उत्सुकता आहे.

आर्या ही भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील हिने साकारली आहे. सोनालीने तिच्या चाहत्यांना काही फोटो आणि विडिओ सुद्धा पोस्ट करून सांगितले आहे की ती आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तिने अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

तिने असंही सांगितलं की, ‘देवमाणूस’ या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि अशावेळी माझी या मालिकेत एन्ट्री होणार यासाठी ती उत्सुक आहे. आर्या ही वकील खूप हुशार आणि जिद्दी आहे तर मग आता देवीसिंग हे प्रकरण आर्या कस हाताळते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.

हे ही वाचा-

रोनाल्डोमुळे काही सेकंदात कोका कोला कंपनीचे २९ हजार कोटींचे नुकसान, पाहा तो विडिओ..

हलगर्जीपणाचा कळस! 899 लोकांना एक्सपायर झालेल्या लसीचे डोस टोचले

माझ्या बायकोचे माझ्या भावोजीसोबत अफेअर होते; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचे खळबळजनक आरोप

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.