कोरोना लसीचा दुसरा डोस नाही घेतला तर काय होईल? वाचा डॉक्टर काय म्हणाले…

देशभरा कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातला आहे. रोज साडे तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह भेटत आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी देशात लसीकरणही सुरु आहे.

आता देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरीकांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. लोकांचा कोरोनापासून बचाव होण्यासाठी त्यांना कोरोनाचे दोन डोस दिले जात आहे. सध्या भारतात दोन प्रकारच्या लसी वापरल्या जात आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्युटची कोविशिल्ड.

लसीकरणाबाबत आरोग्य केंद्राने म्हटले आहे की, पहिला आणि दुसरा डोस एकाच कोरोना लसीचा घेणे गरजेचे आहे. मग ती कोविशिल्ड असो कोव्हॅक्सिन. त्यामुळे अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. त्याच कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला नाही किंवा उशीर मिळाला काय होईल, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. आता या सर्व प्रश्नांचे उत्तर डॉ. तात्याराव लहाने दिले आहे.

कुठल्याही लसीचा दुसरा डोस कधी घ्यायचा हे संशोधकांनी सांगितले आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस तीन महिन्यानंतरही घेतला तरी चालतो. तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चार आठवड्यांनी घ्यायचा आहे.

तसेच त्यात दोन आठवडे उशीर झाला तरी चालेल. सध्या कोरोना लस उपलब्ध नाहीये, पण अशात ज्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, त्यांना प्राधान्यक्रमाने दुसराही डोस देण्यात येईल, असे तात्याराव लहाने यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात दोन्ही प्रकारच्या लसींचा तुडवडा जाणवत आहे. अशावेळी दुसरा डोस मिळाला नाही, तर काय होईल? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर पहिला डोस मिळाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे फारसे घाबरायचे कारण नाही, असे डॉ. लहाने म्हणाले आहे. पण डॉ. राहूल तांबे यांनी यावर सावध मत व्यक्त केले आहे.

तुम्ही दुसरा डोस घेतला नाही, तर पहिल्या डोसमुळे मिळणारे संरक्षण हे कमी आहे. अशा परिस्थितीत पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना होण्याचा धोका राहतो. त्यामुळे संपुर्ण संरक्षणासाठी दुसरा डोस आवश्यक आहे, असे संशोधनातून समोर आहे. तसेच दुसऱ्या डोसनंतरही कोरोना झाला तर संसर्ग कमी असतो आणि लक्षणं सौम्य असतात, असे डॉ. तांबे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कपडे काढ मला तुझे पुर्ण शरीर बघायचे आहे; कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
मधूचंद्राच्या दिवशीच ताप आला अन् नवरदेवाचा झाला मृत्यु; नवरीचा संसार झाला काही तासातच उध्वस्त
धर्मेद्र व हेमा मालिनी यांच्या नात्यात दुरावा? ‘या’ कारणामुळे वर्षभरापासून राहताहेत वेगळे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.