आत्मह.त्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट; पहा काय आहे पोस्टमध्ये

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांच्या नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शितल आमटे यांनी आज आत्म.हत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

आज सकाळी पावणे सहाच्या सुमारास शीतल आमटे-करजगी यांनी एक ट्विट केले होते. वॉर अँड पीस या शीर्षकासह शीतल यांनी एका ऍक्रेलिक पेटिंगचा फोटो ट्विट केला होता. या ऍक्रेलिक पेटिंगच्या खाली स्वत:चं नाव आणि कालची तारीख आहे. दरम्यान, शीतल यांच्या निधनाची बातमी येताच त्यांचे शेवटचे ट्विट चर्चेत आले आहे.

दरम्यान, विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पण त्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

तसेच शितल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.

 

महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ खडसे इन ॲक्शन! मोठा गैरव्यवहार उघड करणार; तेही पुराव्यासहीत
ऑक्सफर्डची कोरोना लस किती प्रभावी? अखेर WHO ने सोडले मौन; म्हणाले..
भाजपचे माजी मंत्री लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावले; ऑडिओ क्लिप व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.