छातीची हाडे तुटली होती हृद्य आणि फुफ्फुसे तर डोळ्यांनी दिसत होते, अशावेळी धावून आला देवमाणूस

२१ मार्च रोजी देवाचीमाळ येथे करण पवार याचा भीषण अपघात झाला. फॅक्टरीमध्ये काम करत असताना या १४ वर्षांच्या मुलाचा हात मशीनच्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला होता. बेल्टमध्ये हात अडकल्याने त्याचे शरीर आपोआप त्याच्यामध्ये ओढत गेले.

हा अपघात इतका भयानक होता की त्याच्यामध्ये त्याची छाती कापली गेली होती. तुम्ही विचारही करू शकत नाही त्याची काय अवस्था झाली होती. करणचे दोन्ही फुफ्फुस आणि हृद्या उघडे पडले होते. त्याचे खुप रक्त वाहू लागले होते.

छातीतील सर्व हाडे फ्रॅक्चर झाली होती आणि सर्व स्नायू तुटले होते. त्याचे हृद्य उघडे पडले होते. अशा अवस्थेत त्याला सोलापूरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला श्वास घेण्यासाठी खुप त्रास होत होता.

त्याला श्वासाची नळी टाकणे गरजेचे होते त्यामुळे तत्परतेने मार्कंडेय सहकारी रूग्णालयात हलवण्यात आले. अशा परिस्थितीत हृदय फुफ्फुस शल्य विशारद डॉ. विजय अंधारे यांनी त्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले.

त्याला बेशुद्ध अवस्थेत शस्त्रक्रिया विभागात हलविण्यात आले. एक टीम तयार करण्यात आली. बंद पडलेल्या फुफ्फुसाला व्हेंटिलेर लाऊन फुगविण्यात आले. फुफ्फुसातून बाहेर पडणारी हवा बंद करण्यात आली.

त्याची इतकी भयानक अवस्था झाली होती की हृद्याच्या नसा उघड्या पडल्या होत्या आणि त्यातून रक्त वाहत होते. मोडलेल्या छातीच्या हाडांना एकत्र करून त्यांना जोडण्यात आले. तुम्हाला विश्वास बसणार नाही शस्त्रक्रियेच्या तासाभरात रूग्ण शुद्धीवरून येऊन बोलत होता.

कुटुंबीयांना तर इतका आनंद झाला होता की विचारूच नका. कारण मुलाची स्थिती पाहून कोणतंच रूग्णालय त्याला दाखल करून घ्यायला तयार नव्हते. दाखल करण्यासाठी पैसैही नव्हते पण डॉ. अंधारे यांनी त्याला दाखल करून घेतले आणि कसलेही पैसे मागितले नाहीत.

त्यांच्या प्रयत्नाने माझा मुलगा मला मिळाला असे नागनाथ पवार म्हणजे करणचे वडिल म्हणाले. सुदैवाने त्याच्या हृदयाला कोणतीच ईजा झाली नव्हती. शस्त्रक्रिया केल्यानंतर तो दोन ते तीन दिवसांनी शुद्धीवर येईल असे त्यांना वाटत होते पण तो तासाभरातच शुद्धीवर आला.

दीड तासाने त्याला व्हेंटीलेटरवरून काढण्यात आले. इतक्या गंभीर जखमी झालेल्या मुलाला आम्ही ६ दिवसांत डिस्चार्ज देणार आहोत असे विजय अंधारे म्हणाले आहेत. त्यांच्या रूपात करणला आणि त्याच्या आईवडिलांना देवमाणूसच भेटला असे म्हणायला काही हरकत नाही.

महत्वाच्या बातम्या
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील जिवलग मित्र तारक मेहता आणि जेठालाल खऱ्या आयूष्यात आहेत दुश्मन
ज्या मैत्रिणीने वाईट दिवसांमध्ये मदत केली; त्याच मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत होते स्मृती इराणीचे अफेअर
दारूच्या नशेत असताना मध्यरात्री अजय देवगणला मारहाण? हा व्हिडीओ खरा की खोटा
असे काय झाले की, जिगरी यार मनोजकुमार आणि प्राणची मैत्री तुटली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.