डॉक्टरांनी इंजेक्शन देऊनही कधी बाळ खुदूखुदू हसताना पाहीले आहे का? मग हा व्हिडिओ बघाच

लहान मुले खूप नाजूक असतात कारण त्यांना थोडाजरी त्रास झाला किंवा दुखापत झाली तरी ते रडायला लागतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू टिकून राहण्यासाठी त्यांचे आई वडील खूप काळजी घेतात.

विशेषतः सुरुवातीच्या काळात बाळांची खूप निगा राखावी लागते. आणि याचदरम्यान बाळांना वेगवेगळ्या रोगांपासून वाचवण्यासाठी लसीकरण करावे लागते जे एक कठीण काम आहे. कारण एकदा डॉक्टरांनी इंजेक्शन दिले की लहान मुले मोठमोठ्याने रडायला लागतात.

पण एक डॉक्टर असे आहेत जे मुलांना इंजेक्शन देऊनही हसवतात. सध्या सोशल मीडियावर त्याच डॉक्टरांची चर्चा रंगलेली आहे. या व्हीडिओमध्ये एक लहान मुलगा डॉक्टरांकडे इंजेक्शन घेण्यासाठी आलेला असतो. डॉक्टर त्याला इंजेक्शन देण्याच्या आधी खूप हसवतात.

डॉक्टरांच्या करामती पाहून बाळ हसायला लागते आणि डॉक्टर त्याला हसता हसताच इंजेक्शन टोचवतात. मुलगा हसण्यामध्ये इतका गुंतलेला असतो की त्याला कधी सुई टोचली कळतच नाही. तो डॉक्टरांकडे एकटक पाहत राहतो.

हा व्हिडिओ बघणाऱ्यालादेखील हसू फुटेल एवढा गमतीशीर हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओला ३६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. ट्विटरवर एका युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला २०० पेक्षा जास्त कंमेंट्स आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये डॉक्टर गाणे म्हणतानाही दिसत आहेत. खरंतर सगळ्या डॉक्टरांनी बाळाला इंजेक्शन देताना हीच ट्रिक वापरली पाहिजे.

https://twitter.com/buitengebieden_/status/1334626916595355653?s=19

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.