ज्या रुग्णालयात ५० वर्ष रुग्णांची सेवा केली, तिथेच व्हेंटिलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा झाला मृत्यू

प्रयागराज | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाने रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कोरोनाने देशातील वातावरण चिंताजनक झालं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करत आहे.

कोरोना काळात डॉक्टर, पोलिस कर्मचारी, नर्स, महापालिकेचे आरोग्य अधिकारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. आपल्या परिवाराचा विचार न करता हे करोना योध्दे रुग्णांसाठी काम करत आहेत.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने लस, ऑक्सिजन, बेड यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोनाने डॉक्टरांचाही बळी घेतला आहे. मुंबईतील ठाण्यामध्ये काही दिवसांपुर्वी डॉक्टर बापलेकाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.

आता पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोनाने एका नामांकित डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला आहे आणि या ज्येष्ठ डॉक्टरने आपल्या डॉक्टर पत्नीसमोरचं जीव सोडला आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये स्वरुप राणी  नेहरू रुग्णालय आहे. शहरातील हे सर्वात मोठं रुग्णालय आहे. या रुग्णालयात अनेक विद्यार्थी शिकून डॉक्टर झाले आहेत. त्याच मुलांना शिकवण्याचं काम ८५ वर्षीय डॉक्टर जे.के. मिश्रा करत होते.

आयुष्यातील ५० वर्ष त्यांनी याच रुग्णालयात काम केले होते. यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे रुग्णांची सेवा केली होती. मिश्रा यांच्या पत्नी रमा यासुध्दा डॉक्टर आहेत. मात्र डॉक्टर पत्नीसमोरचं मिश्रा यांचा तडफडून मृत्यू झाला आहे.

डॉ. रमा मिश्रा यांनी सांगितले की, मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोरोनामुळे खुप त्रास होऊ लागला होता. दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली होती. त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती मात्र व्हेंटिलेटर मिळाला नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला आहे.

एका प्रसिध्द डॉक्टरने आपल्या आयुष्यातील ५० वर्ष ज्या रुग्णालयाची सेवा केली. त्याच रुग्णालयात  व्हेंटिलेटर न मिळाल्याने डॉक्टरचा दुर्देवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. मिश्रा यांच्या कुटूंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार,  देशात आजवर कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ वर जाऊन पोहोचली आहे. तर  १ लाख ९७ हजार ८९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
सुजय विखेंनी दिल्लीवरून आणलेल्या इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक, कारवाईचे दिले आदेश  
मदतीचा ओघ सुरू! दीड लाख अधिकाऱ्यांचा २ दिवसांचा ५० कोटी रूपये पगार मुख्यमंत्री निधीला
‘एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही, अन् दुसरीकडे सरकार, संघमालक IPL वर एवढा खर्च करतायेत’
कोण आहेत प्यारे खान? ज्यांनी गरीब रूग्णांना ऑक्सिजन मिळावा म्हणून ८५ लाख खर्च केले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.