‘ह्या’ डाॅक्टरचा अजब दावा! म्हणतोय कोरोनावर दारू आहे गुणकारी; वाचा त्याचं नेमकं म्हणणं काय..

अहमदनगर । देशात कोरोनाचे थैमान वाढत असून यावर अजूनही प्रभावी औषध आले नाही. यामुळे लस हाच काहीसा पर्याय यावर आहे, मात्र लसीकरणाचा देखील देशात मोठा तुटवडा जाणवत आहे. असे असताना आता कोरोनावर एक प्रभावी औषध असल्याचा दावा केला जात आहे.

कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला आहे.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत ४० ते ५० जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचे औषधी प्रमाण घेण्यास सांगतिले. यामुळे त्यांच्या व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

यामुळे ४० ते ५० पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी १० रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले. आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असे अरुण भिसे यांनी सांगितले आहे. यामुळे दारू खरचं गुणकारी आहे का.? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तोंडाची चव जाईल, आणि जेवण कमी होईल, त्या दिवसापासून अल्कोहोल ज्यामध्ये ४० टक्के पेक्षा जास्त आहे, देशी दारु, व्होडका, ब्रँडी किंवा विस्की या पैकी कोणतीही एक दारी ३० मिली आणि ३० मिली पाणी पेशंटला जेवणाअगोदर पिण्यास द्यायचे आहे.

मात्र पेशंट गरोदर आणि लिव्हर संबंधी आजार नसला पाहिजे. दारु आणि पाणी याचे मिश्रण डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावे, असे आवाहन डॉ. अरुण भिसे यांनी केले आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

आज राज्यातील ‘या’ भागात धडकणार ताऊते चक्रीवादळ; हवामान खात्याने सांगीतले ‘असा’ करा बचाव

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते वादळाचा हाहाकार; कोकण किनारपट्टीचे मोठे नुकसान

मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.