मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजी औरंगाबादमंध्ये सभा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेनं आता याच पार्श्वभूमीवर 14 मे रोजी एक जाहीर सभा आयोजित केली आहे. याबाबतचा टीझर शिवसेनेनं आज सकाळी आपल्या अधिकृत ट्विट्रर हँडलवरून शेअर केला आहे.
शिवसेनेनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे फोटो आणि दृश्य वापरल्याचा दावा मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे. शिवसेनेच्या यावेळी व्हिडीओमधील काही स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विट्रर खात्यावरून शेअर करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ‘असली-नकली म्हणणाऱ्यांनी स्वत:चं आत्मपरीक्षण करावं. काहीतरी अस्सल तुमचं असुद्या. इतकही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि सभेमधील गर्दी मनसेच्या सभेची. मानसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का?’ असा खोचक सवाल देखील काळे यांनी विचारला आहे.
असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची…अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की…नकली हिंदुत्ववादी pic.twitter.com/LVKtoq7e6t— Gajanan Kale (@MeGajananKale) May 11, 2022
आज सकाळी शिवसेनेच्या अधिकृत ट्विट्रर पेजवर शिवसेनेनं त्याच्या 14 मे रोजी होणाऱ्या सभेचा एक टीझर प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवाजी पार्क येथे शिवतीर्थावर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याचे फोटो वापरण्यात आले आहेत.
गजानन काळे यांनी पुढे म्हंटल आहे की, शिवसेनेचा नेमका आत्मविश्वास गेलाय का? की त्यांना नैरश्य आलंय? असली-नकलीच्या गप्पा मारताना आता तुमचं नकली हिंदुत्व उघड पडू लागलं आहे. राजसाहेबांच्या फोटोचा आधार घेऊन शिवसेना गर्दी जमवत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या नेतृत्वाने आणि शिवसेनेनं आता गमछा मारण बंद करावं आणि आता शिवसेनेनं नाव बदलून चोर सेना किंवा नकली सेना ठेवाव, असंही गजानन काळे यांनी यावेळी म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या:-
काश्मिर फाईल्समुळे सिंगापुरमध्ये उडाला गोंधळ, बंदी घालण्याची तयारी सुरू, वाचा नेमकं काय घडलं?
योगी सरकारचं मुंबईत कार्यालय होणार, संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रसुद्धा लवकरच अयोध्येत आणि..
राज ठाकरेंना उंदीर म्हटल्याने भडकले शिवसैनिक; म्हणाले, एक महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी म्हणून…