‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतील खतरनाक व्हिलन संस्कार पंडीत आठवतोय का?

राजा शिवछत्रपती म्हणलं की, नकळत आपल्या डोळ्यासमोर त्यांचा चेहरा येतो. अनेक ऐतिहासिक भुमिकांमधून त्यांनी आपली छाप सोडली आहे. दर्जेदार व्यक्तीमत्व आणि प्रभावीशाली वक्तृत्व शैली असणारे अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस आहे.

राजकारणात त्यांनी आपल्या दमदार व्यक्तीमत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारणासोबतच त्यांनी अभिनय क्षेत्रात देखील स्वतः च्या मेहनतीने एक ओळख निर्माण केली आहे. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास जाणून घेणार आहोत.

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे असे त्यांचे पुर्ण नाव आहे. १८ सप्टेंबर १९८० रोजी त्यांचा जन्म नारायणगाव येथे झाला. त्यांनी त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण नारायणगावमध्ये केले. पण पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्यात आले. ते लहानपणापासूनच शिक्षणात अतिशय हुशार होते.

शालेय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईत जाण्याचा निर्णय घेतला. दहावी आणि बारावी या दोन्ही वेळेस अमोल कोल्हे यांचे नाव गुणवत्ता यादीत आले होते. वैद्यकीय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस देखील केली.

अभ्यासात हुशार असणारे अमोल अभिनय क्षेत्राकडे कसे आले? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कॉलेजमध्ये असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्याचं कालावधीमध्ये त्यांनी अनेक नाटके केली आणि त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेतून त्यांनी आपली ही आवड जोपासली.

कॉलेजमध्ये असताना त्यांच्या दमदार अभिनयाने अनेकांना प्रभावित केले. त्यासाठी त्यांचे अनेकांनी कौतुक केले. त्यानंतर त्यांनी ठरवले की, त्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण शिक्षण देखील पुर्ण करायचे आहे. कारण त्यांचे म्हणणे होते की, आवड जोपासावी पण शिक्षण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते अभिनय क्षेत्रात आले.

लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती. त्यामूळे ते नेहमी फिट राहायचे. त्यांच्या फिटनेसला पाहून अनेक भुमिकांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी प्रपोजल, भगवा, शिवपुत्र शंभूराजे यांसारखे अनेक नाटके केली. त्यासोबतच त्यांनी आधुरी एक कहाणी, ओळख आणि ह्या गोजिरवाण्या घरात अशा मालिकांमध्ये काम केले.

अभिनयासोबतच त्यांनी अनेक कार्यक्रमांचे निवेदन देखील केले. कार्यक्रमांचे निवेदन करत असताना त्यांना असणारी भाषेची जाण लोकांना समजली. त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. पण खरी ओळख अजून मिळायची होती. ती ओळख त्यांना दिली स्टार प्रवाहवरच्या ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेने. या मालिकेने डॉ.अमोल कोल्हे यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले.

अभिनयातील उत्तम समज, आवाजातील कणखरपणा आणि भेदक नजरने त्यांनी या भुमिकेला योग्य न्याय मिळवून दिला. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि प्रसिद्धीही मिळाली. राजा शिवछत्रपती यांचे नाव काढल्यानंतर नकळत लोकांच्या डोळ्यासमोर डॉ.अमोल कोल्हे यांचा चेहरा येऊ लागला.

या कालावधीमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. जसे की, साहेब, रमा माधव, राजमाता जिजाऊ, रंगकर्मी, आघात हे त्यातलेच काही चित्रपट. ज्या प्रकारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका निभावली. त्याच प्रमाणे त्यांनी झी मराठीच्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत संभूराजे यांची भूमिका निभावली.

त्यांच्या आक्रमक वक्तृत्व शैलीने त्यांना राजकारणात प्रवेश मिळवून दिला. २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनाचा स्टार प्रचारक म्हणून अनेक ठिकाणी भाषण केले. त्यांनतर २०१९ मध्ये ते राष्ट्रवादीमधून शिरूर येथून निवडणूआले. त्यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी असते. त्यामूळे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नीला खुप जास्त महत्व आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.