गौरी लंकेश लक्षात आहे का ? पत्रकार राणा अय्यूबला खुन आणि बलात्काराच्या धमक्या

नवी दिल्ली | भारतीय पत्रकार राणा अय्युबने जम्मू-काश्मीरमध्ये बशीर अहमद खानच्या हत्येच्या विरोधात पोस्ट केली होती. यानंतर सोशल मीडियावर तिला ठार मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्यांचे मेसेज आले आहेत. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामला तिला हे मेसेज आले आहेत. तिने त्याचे स्क्रीनशॉट ट्विटरला पोस्ट केले आहेत.

अय्यूबच्या म्हणण्यानुसार, बुधवारी काश्मीरच्या सोपोर भागात अतिरेकी आणि सुरक्षा कर्मचार्‍यांच्या चकमकीत श्रीनगरमधील ६५ वर्षीय बशीर अहमद खान यांची हत्या झाली. या हत्येविरोधात बोलल्यानंतर तिला या धमक्या सुरू झाल्या आहेत.

या हत्येमुळे काश्मीरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. बशीर अहमद खानच्या मुलाचा मृतदेहावर बसलेला एक फोटोही व्हायरल झाला आहे.

“प्रत्येक वेळी मी काश्मीरवर लिहिते किंवा बोलते, तेव्हा माझ्याबद्दल द्वेष पसरतोय तो अकल्पनिय आहे. यावेळी मात्र मला वाटतंय की ते लोक खूप निर्लज्जपणे टीका करीत आहेत. यापूर्वी मी त्यांचे मेसेज मधील शब्द दाखवत नव्हते पण आता मला कशाचीही भीती नाहीये मी त्यांना घाबरत नाही.

माझे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट पूर्णपणे धमक्यांच्या मेसेजनी भरलेले आहे. जेव्हा पण मी काही ट्विट किंवा किंवा पोस्ट केले की, ते लोक मला गौरी लंकेशच्या हत्येची आठवण करून देत आहेत.

“मला आठवते की गौरी मरण्याच्या तीन दिवसांपूर्वी, जेव्हा ती पण असाच आवाज उठवत होती. तेव्हा तिला पण असेच मेसेज येत होते. ती म्हणाली काळजी करण्याची काहीही गरज नाहीये हे लोक काहीही करणार नाहीत, पण त्याच्यानंतर तिची हत्या करण्यात आली”.

“त्यामुळे ऑनलाईन द्वेष पसरवणाऱ्या लोकांना नेहमी सोडून देणे बरोबर नाही. त्याच्यामागे त्यांची काहीतरी योजना असणार आहे. त्यामुळे जोपर्यंत हे ऑनलाईन द्वेष पसरवणारे आहेत त्यांच्यामुळे भीती वाटते. असं तिने प्रिंट या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले आहे”.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.