जगातील सर्वात लहान आई तुम्हाला माहितीय का? वाचून धक्का बसेल

आई होणे ही गोष्ट प्रयत्न स्त्रीसाठी खुप महत्त्वाची असते. त्यासोबत तिचे अनेक स्वप्न जोडलेले असतात. पण जर ती खुप लहान वयात आई झाली.

तर मग तिला आणि त्या बाळाला खुप अडचणींचा सामना करावा लागतो. पण कधी कधी काही मुली खुपच लक्षण वयात बाळाला जन्म देतात.

आज आपण जगातल्या सर्वात लहान वयाच्या आईबद्दल जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे पेरू देशातील एका पाच वर्षांच्या मुलीची. या लहान वयात तिच्यावर खुप मोठे संकट आले होते.

कारण अवघे ५ वर्षे ७ महिने वय असलेली लीना मेदिना आई झाली होती. लीनाचा जन्म १९३३ साली पेरूच्या एका छोट्या गावी झाला होता.

पाच वर्षांची लीना नेहमी तिच्या खेळामध्ये रमलेली असायची. पण अचानक तिचे पोट वाढायला लागले होते. त्यामूळे घरातले सर्वजण परेशान झाले.

त्या काळात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामूळे लीनाला सर्वप्रथम उपचारासाठी एका घरगुती वैद्याला दाखवले. त्यांना देखील सुरुवातीला काही समजत नव्हते.

पण नंतर त्यांनी लीनावर उपचार सुरू केले. पण तिच्या पोटाचा आकार वाढतच होता. त्यामूळे तिला मोठ्या शहरातील दवाखान्यात घेऊन गेले.

तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले आणि डॉक्टरांना देखील धक्का बसला. कारण लीना गरोदर होती. ५ वर्षांची मुलगी गरोदर कशी काय असू शकते? हा प्रश्न डॉक्टरांना पडला.

ही गोष्ट डॉक्टरांनी लीनाच्या घरच्यांना सांगितली आणि त्यांना देखील धक्का बसला. त्यांना विश्वासच बसत नव्हता. पण लीनाला सातवा महिना सुरू होता.

लीना पाच वर्षांहून कमी वयाची असताना ही गर्भधारणा झाली होती. डॉक्टरांना सुद्धा काय करावे सुचत नव्हते. कारण बाळ किंवा आई दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचा धोका होता.

त्या काळी कोणत्याही मोठ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामूळे लीनावर उपचार कसे करायचे? हा मोठा प्रश्न होता. पण शेवटी खबरदारी घेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले.

१४ मे १९३९ साली लीनाने बाळाला जन्म दिला. त्याचे नाव काय ठेवावे हा पेच लगेच सोडवून ज्या डॉक्टरांनी उपचार केले. त्यांच्या नावावरून मुलाचे नाव ‘जोरार्दो’ ठेवण्यात आले.

पण सर्वांसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. तो म्हणजे लीना आई कोणामुळे झाली? बलात्काराच्या आरोपात लीनाच्या वडिलांना अटक करण्यात आली.

पण ते निर्दोष होते. त्यामूळे त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर लीनाच्या मतिमंद भावाला अटक करण्यात आली. पण त्याच्या विरोधात देखील पुरावे उपलब्ध नव्हते.

ही गोष्ट त्याकाळी खुप प्रसिद्ध झाली होती. मीडियाने देखील ही गोष्ट खुप उचलून धरली होती. लीनाला अनेक वेळा मुलाखतींसाठी बोलवण्यात आले होते. पण तिच्या परीवाराने या गोष्टीला नेहमी नकार दिला.

लीनाचे बाळ तिच्यासोबत मोठे होत होते. लीनाच्या बाळाला तो मोठा होईपर्यंत लीना तुझी बहीण आहे. असे सांगण्यात आले होते.

पण नंतर त्याला सत्य समजले आणि त्याला खुप मोठा धक्का बसला. लीनाचे हे बाळ ४९ वर्ष जगले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

लीनाने ती मोठी झाल्यानंतर दुसरे लग्न केले. लग्नानंतर तिने बाळाला जन्म देखील दिला. ती आजही जिवंत आहे आणि आपल्या कुटुंबासोबत पेरूमध्ये राहत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.