Share

IPS Anjana Krishna : वडील छोटे दुकानदार, आई कोर्टात टायपिस्ट; अजित पवारांना भिडणाऱ्या IPS अंजना कृष्णा यांची पार्श्वभूमी माहितीये का? वाचा यशोगाथा

IPS Anjana Krishna : सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा (Karmala Solapur) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) म्हणून कार्यरत असलेल्या अंजना कृष्णा (Anjana Krishna) यांचा संघर्ष आणि यश ही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram Kerala) येथील मूळ गाव असलेली अंजना यांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत यूपीएससी परीक्षेत ३५५ वा रँक मिळवला.

त्यांची ही यशोगाथा त्यांच्या कुटुंबातील साधेपणातून सुरुवात होते. आई सीना कृष्णा (Seena Krishna) कोर्टात टायपिस्ट आहेत, तर वडील बीजू कृष्णा (Biju Krishna) कपड्यांचा छोटा व्यवसाय चालवतात. शालेय शिक्षण त्यांनी सेंट मेरी सेंट्रल स्कूल (St Mary Central School Poojapura) येथून घेतले, आणि नंतर एनएसएस कॉलेज फॉर वुमन, नीरमंकारा (NSS College for Women, Neeramankara) येथून गणित विषयात बीएससी पदवी मिळवली.

कठोर परिश्रम आणि चिकाटीने मिळाले यश

अंजना कृष्णा यांनी नागरी सेवेत जाण्याचे स्वप्न शालेय शिक्षणापासून बाळगले आणि तयारीला सुरुवात केली. यूपीएससी सारखी कठीण परीक्षा सहजगत्या पार पाडणे सोपे नसते; मात्र अंजना यांनी सातत्याने मेहनत केली आणि हार मानली नाही. त्यांच्या चिकाटीमुळे आणि कठोर परिश्रमामुळे त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2022-23 मध्ये ३५५ वा रँक मिळवून आयपीएस (IPS) कॅडरमध्ये स्थान मिळवले.

सोलापूरमध्ये डीएसपी म्हणून कार्य

सध्या अंजना कृष्णा (Anjana Krishna) सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तहसीलमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्या कायदा व सुव्यवस्था राखण्याची, नागरिकांना सुरक्षितता देण्याची आणि समाजात न्यायाची भावना मजबूत करण्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या यशामुळे अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळाली आहे.

अजित पवारांशी चर्चेचा व्हायरल व्हिडिओ

अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू (Kurdu Solapur) गावातून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अंजना कृष्णा (Anjana Krishna) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी चर्चेत दिसत आहेत. त्यांच्या ठाम भूमिका आणि प्रामाणिकपणा चर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now