तुम्हाला माहितीये का? पंतप्रधान नरेंद्र मोदी FB, Insta, Twitter, यांसह एकूण ‘१०’ सोशल मीडियावर आहेत सक्रिय

 

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये  झालेल्या झटापटीत भारताचे जवान शहिद झाले आहे. यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.

तसेच आता केंद्र सरकारही चीन विरोधात कठोर पावले उचलताना दिसत आहे. यासाठी केंद्राने चीनच्या ५९ अ‍ॅपवर भारतात बंदी घातली आहे.

या अ‍ॅपच्या बंदी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या लोकप्रिय सोशल मीडिया वेबसाईटला रामराम ठोकत आपले अकाउंट डिलीट केले आहे.

नरेंद्र मोदी यांनी चीनमध्ये लोकप्रिय असणाऱ्या विबो या सोशल नेटवर्किंग साईटवरील आपले अधिकृत अकाऊंट बंद केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर अधिकृत अकाऊंट आहे. यासोबतच त्यांचे युट्युब, पिंट्रेस्ट, या नेटवर्किंग साईटवरही मोदींचे अकाऊंट आहे.

तसेच फ्लिकर, टंबलर, लिंकडीन, मिक्स, या सोशल नेटवर्किंग साईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अकाऊंट आहे. मोदींचे विबो वरही अकाऊंट होते, मात्र ते चिनी अ‍ॅप असल्याने ते मोदींनी बंद केले आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांची अधिकृत वेबसाईट असून, मोदी यांचे गूगल प्लेस्टोअरवर अ‍ॅपही आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.