तुम्हाला माहिती आहे का सोनू सूदकडे रोज कितीजण मदत मागतात ? आकडेवारी बघून धक्का बसेल..

मुंबई | बॉलीवूड चित्रपटात जरी खलनायक म्हणून अभिनय करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात अनेक लोकांचा हिरो बनला आहे. हिरोच काय काही लोक तर त्याला देव मानतात. लॉकडाऊनमध्ये त्याने लोकांची केलेली मदत पाहून अनेक जण त्याचे फॅन झाले आहेत.

मजुरांच्या मदतीपासून सुरू केलेला हा प्रवास त्याने असाच पुढे चालू ठेवला आहे आणि आता त्याने व्यापक रूप घेतले आहे. त्याने फक्त भारतातील नाही तर भारताबाहेर अडकलेल्या लोकांचीही मदत केली आहे. इतकेच नाही त्याने बेरोजगार लोकांना रोजगार देण्याचेही ठरवले आहे.

शक्य तेवढ्या लोकांना तो मदत करत आहे. सोनूला रोज लोक कोणत्यातरी माध्यमातून मदतीसाठी संपर्क करत असतात. पण रोज किती लोक त्याला मदत मागतात पण आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हते की त्याला नक्की रोज किती लोक मदत मागतात.

सोनुने नेमकी आकडेवारी ट्विटरवर शेअर केली आहे. एका दिवशीची आकडेवारी पाहून लोक अवाक झाले. सोनुने लिहिले की, त्याला रोज ११३७ मेल्स, १९,००० फेसबुक मेसेज, ४८१२ इन्स्टाग्राम मेसेजेस आणि ६७४१ ट्विटर मेसेजेस. हे आज आलेले मदतीचे मेसेजेस आहेत.

सरासरी रोज त्याला एवढे मेसेजेस येत असतात. त्याने शेवटी लिहिले आहे की, एक माणूस म्हणून मला सर्व लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. पण तरी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो. जर माझ्याकडून तुमचा मेसेज मिस झाला असेल तर मला माफ करा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.