महाराष्ट्रातील या गावाबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का; जिथे बेरोजगार शोधुन सापडणार नाय

आपला भारत देश म्हणजे सर्वाधिक बेरोजगार असलेला देश असे होताना दिसत आहे. पोट भरण्यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. उच्च शिक्षण घेऊनही अनेकजण नोकरीच्या शोधात बेरोजगार झालेले आहेत. सरकारी आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी झालेल्या आहेत. ही बेरोजगारी वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. बेरोजगारीला कंटाळून अनेक जणांनी जीव दिलेला आहे. पण महाराष्ट्रातील असे एक गाव आहे ज्यांना बेरोजगाराची कधी जाणीव झाली नाही.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील ‘वरखेडा’ या गावातील अनेकजण पदवीधर असूनही त्यांनी नोकरी न करता फरशी बसवणे तसेच त्याची विक्री करणे हा व्यवसाय हाती घेत त्यांनी बेरोजगारी नष्ट केली आहे. या गावात प्रत्येक घरातील एकजणतरी फरशी संबंधीतील कामात तरबेज आहे. त्यामुळे त्यांना गावातील बेरोजगारी नष्ट करण्यास यश आले आहे.

गावातील लोकांकडे शेती असुन कोणीही शेती करण्याच्या मागे लागत नाही. फरशी बसवायचे काम करून त्यांना रोज १००० रूपये रोजगार मिळतो. त्यामुळे शेती करण्यात कोणी जात नाही.

फरशी बसवणे, टाईल्स, किचन ओटा, भांड्यांचे रॅक बनवणे, किचन ट्रॉली, घराची भिंत रंगीबेरंगी फरशा बसवून डिझाईन करणे. अशी कामे ते चांगल्या पध्दतीने करतात.

वरखेडगावची लोकसंख्या दहा हजार असून त्यातील तीन हजारच्या आसपास फरशीच्या कामात पटाईत आहेत. त्यात १० वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षांची म्हतारी माणसे या कामात आहेत.

या कामातून त्यांनी स्वताची प्रगती तर केलीच पण बाहेरगावात कामासाठी गेलेल्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना बोलावून त्यांचीपण बेरोजगारी दुर केली. या कारागीरांनी धुळे जिल्ह्यात कामे केलीच त्याचबरोबर त्यांच्या कामाची दर्जा पाहून पुणे, मुंबई, मध्यप्रदेश, गुजरात, मद्रास, गोवा या मोठ्या शहरात त्यांना कामासाठी लोक घेऊन जात आहेत. आणि आजुनही त्यांना कामासाठी बोलावण्यात येत आहे.

कोणतेही काम करताना लाजायचे नाही. चिकाटीने काम करून पोट भरायचे असते. प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश नक्की मिळते हे यांनी दाखवून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लालुप्रसाद यादवांच्या प्रकृतीबाबत गंभीर माहिती आली समोर; वाचून धक्का बसेल
“..आणि प्रायव्हेट पार्ट दाखवत ‘त्यानं’ केलं घाणेरडं कृत्य”; शर्लिनचा साजिद खानवर आरोप
….म्हणून शरद पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करू वाटते; पंकजा मुंडेंनी सांगितली ‘मत की बात’
पुण्यामध्ये पारंपारिक पद्धतीने सिध्दार्थ आणि मितालीचा विवाहसोहळा पडला पार बघा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.