१२ दिवसाच्या आत ‘हे’ उपाय करा, नाहीतर तुमचे नाव रेशनकार्डमधून कट होईल

ही बातमी नीट वाचा कारण देशातील सुमारे २४ कोटी रेशनकार्ड धारकांना ही बातमी वाचणे आवश्यक आहे. कारण देशात आता आपले रेशनकार्ड आधार कार्डशी जोडण्यासाठी केवळ बारा दिवस शिल्लक राहिले आहेत. या उरलेल्या बारा दिवसात आपले रेशनकार्ड आधारशी लिंक करून घ्या.

जर असे केले नाही तर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहाल. रेशनकार्ड रद्द झाल्यामुळे तुमचे नाव यादीतून कापले जाऊ शकते. त्यासाठी ३० सप्टेंबरच्या आधी आपले रेशनकार्ड आधारशी लिंक करून घ्या. केंद्र सरकारने सर्व राज्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

देशात सध्या २३.५ कोटी रेशनकार्डधारक आहेत. ज्यामध्ये ९० टक्के लोकांनी आपले आधारकार्ड पॅनकार्डला लिंक केलेले आहे. आता हे सर्वांनाच माहीत आहे की, रेशनकार्डद्वारे लोक सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत वाजवी किंमतीच्या दुकानांत बाजारपेठेच्या किमतीपेक्षा कमी किंमतीत धान्य खरेदी करू शकतात.

जर तुमचे रेशनकार्ड आपल्या पॅनकार्डला लिंक केलेलं नसेल तर सावध व्हा. यासाठी तुम्ही PDS दुकानात जाऊन देखील आपल्या रेशन कार्डला आधारशी लिंक करू शकता. याची माहिती तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर मिळेल. यासाठी PDS केंद्रात रेशनकार्ड व कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जा.

कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो रेशनकार्डसोबत जमा करा. बायोमेट्रिक मशीनवर बोट ठेवले की तुम्हाला सगळी माहिती मिळेल. अधिकारी आपले संपूर्ण डिटेल आणि आधार क्रमांकाशी जोडेल. रेजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.

जेव्हा तुमचे आधार रेशनकार्डला जोडलेले नसेल तेव्हा तुम्हाला पोर्टेबिलिटी सेवेचा फायदा होणार नाही. आतापर्यंत २६ राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेत सहभागी करून घेतले आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत या देशात ८१ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमात जोडण्याची सरकारची योजना आहे.

३१ मार्चपर्यंत देशातील सर्व राज्यांना या योजनेत जोडण्याचा सरकारचा उपक्रम आहे. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्व ८१ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल असा सरकारचा प्लॅन आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.