काळजी घ्या! चुकूनही स्कॅन करू नका क्यूआर कोड, अन्यथा रिकामं होईल तुमचं अकाऊंट

मुंबई | अलीकडे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवले जात आहे.  Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते.

आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. क्यूआर कोड फिशिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि यापासून कशी फसवणूक केली जाऊ शकते याबाबत जाणून घेऊया. आपण दुकान किंवा काउंटरवर क्यूआर कोडद्वारे स्कॅन करुन पैसे भरल्यास कमी धोका असतो, मात्र स्कॅमर्सना येथे फसवणूक करण्याचे काही नवीन मार्ग देखील सापडले आहेत.

‘५००० रुपये जिंकल्याबद्दल अभिनंदन’ यासारखे मजकूर संदेश अज्ञात व्यक्ती नागरीकांना  पाठवतो. या संदेशामध्ये आपल्याला सांगितले जाते की, कोड स्कॅन केल्यानंतर, यूपीआय पिन प्रविष्ट केल्यानंतर रक्कम प्रविष्ट केल्यास ती रक्कम आपल्या खात्यात जमा होईल. यासह क्यूआर कोडचा फोटोही पाठविला जातो.

बनावट कोड स्कॅन केल्यावर, वापरकर्त्यास एका मूळ पृष्ठाकडे निर्देशित केले जाते जे खरे असल्यासारखे दिसते. तेथे पीडिताला वैयक्तिक ओळखण्यायोग्य माहिती नोंदवून लॉगिन करण्यास सांगितले जाते. नागरिक यावर विश्वास ठेवतात आणि फसवणूक करून घेतात. यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना काळजी घ्या.

दरम्यान, तुम्हाला जर या फसवणुकीपासून वाचायचे असल्यास सुरक्षा सॉफ्टवेअरसह डिव्हाइस नेहमी अपडेट ठेवा. जर कोणत्याही गतिविधीचा संशय असेल तर त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधा. तसेच आर्थिक व्यवहारात शंका निर्माण झाल्यास राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार देखील दाखल करू शकता.

याचबरोबर तुम्ही जर पैसे भरण्यासाठी क्यूआर कोड वापरत असल्यास तर दर्शविलेल्या माहितीकडे लक्ष द्या. क्यूआर कोडला एका लिंकप्रमाणे पहा. हा कोड कोठून आला असेल याबाबत काही शंका असेल तर स्कॅनिंग टाळा.

महत्त्वाच्या बातम्या
नरेंद्र मोदी आईला भेटताना आम्हाला जवळ येऊ देत नाहीत; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
३५ वर्षांपूर्वी माझ्या घरातील पंतप्रधान, मग घराणेशाही कुठेय? राहुल गांधींचा भाजपाला सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.