व्हॉट्सॲपवर आलेल्या ‘या’ लिंकवर क्लिक करु नका, नाहीतर अकाऊंटमधून होऊ शकतात पैसे गायब

कोरोना काळात देशभर ज्या प्रकारची परिस्थिती आहे, अशा अनेक चुकीच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या व्हॉट्सॲपवर एक मॅसेज पाठवण्यात येत आहे ज्यात कोरोना महामारी काळात सरकारकडून आपल्याला मदत निधी दिली जात आहे. अशी एक लिंक देण्यात येत आहे.

या मॅसेजमध्ये सांगितले की, तुम्हाला कोरोना महामारी काळात सरकारकडून मदत निधी दिला जात आहे. जाणून घ्या तुम्ही निधी कसा मिळवू शकता. जर तुमच्या व्हॉट्सअपवर असा मॅसेज आला तर सावध रहाण्याची गरज आहे. याबाबत सरकारकडून सर्व यूजर्सला अशाप्रकारच्या फेक मॅसेजपासून सावध रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा फेक मॅसेज आहे, जो हॅकर्सद्वारे सर्क्युलेट केला जात आहे. हॅकर्स याचा फायदा घेऊन तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला या लिंकवर क्लिक करायचे नाही तसेच हा मॅसेज कुणालही फॉरवर्ड करायचा नाही असा सावध राहण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होणारे काही मेसेज खोटे असल्याचे म्हटले आहे. भारत सरकारने कोविड १९ बाबत असा कोणताही फंड जारी केलेला नाही. यामुळे यूजर्सने अलर्ट रहावे. ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, चुकूनही हा मॅसेज फॉरवर्ड करू नका. याशिवाय अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.

सोबतच सरकारने इशारा दिला आहे की, अशाप्रकारचा मॅसेज तुमचा फोन हॅक करू शकतो. तुमचा डाटा चोरी करून बँक अकाऊंटमधून पैसे गायब होऊ शकतात.

संजय राऊतांची बोलतीच बंद झालीय; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोमय्यांनी सुनावले

एबीपी माझा पुन्हा वादात; ‘या’ नेत्याने केला खोटी बातमी दिल्याचा आरोप; माफीची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.