कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, समोर आले त्यामागचे कारण; तज्ञांनी मोदींना दिला इशारा

कोरोनाने जनजीवन घडी विस्कळीत केली आहे. कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असतानाच केंद्र सरकारनं लसीकरणमोहिमेवर भर दिला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

या घोषणेनंतर तज्ञांनी मोदींना एक रिपोर्ट दिला आहे. त्यांच्या मते जे लोक कोरोनातून बरे झाले आहे त्यांना लसीची आवश्यकता नाही अशी शिफारस तज्ञांनी पंतप्रधानांना केली आहे. प्रथम गरज असलेल्यांना लसीकरण द्यावे अशी मागणी केली आहे.

तज्ञांच्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणात लसीकरण आखण्यापेक्षा ज्या लोकांना अधिक धोका आहे अश्या लोकांचे लसीकरण केले जावे. सरसकट लसीकरण हे अपूर्ण पडू शकते त्यामुळे व्हायरस म्यूटेंट आणखी जास्त पसरू शकेन अस तज्ञांच म्हणन आहे.

तज्ञांच्या टीम मध्ये एम्सचे डॉक्टर आणि कोविड १९ संधर्भातील टास्कफोर्स सदस्य आहेत. या समुहाने अलीकडे जो रिपोर्ट दिला त्यात सांगितले की, मोठ्या संख्येने लसीकरण करण्यापेक्षा ज्यांना गरज आहे आणि अतिजोखीम असलेल्या लोकांना कोरोनाची लस द्यावी.

तसेच ज्या भागात संक्रमण वेगाने वाढते अश्या भागात कोविशील्ड लसीच्या डोसमधील अंतर कमी करण्यात याव. सध्या दोन लसीमधील अंतर कमीत कमी १२ आठवडे ठेवण्यात आले आहे. इंडिअन असोसिएशन ऑफ प्रीवेटीव एण्ड सोशल मेडीसिनच्या तज्ञांनी हा रिपोर्ट बनवला आहे. सर्वाधिक कोरोना लसीकरण करण्याचा आणि कश्या पद्धतीने करावा हे या रिपोर्ट मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवला आहे.

सर्व वयोगटातील लोकं तसेच मुलांचे लसीकरण कारण योग्य राहणार नाही आणि ते परवडणार नाही. अनियोजित लसीकरणामुळे व्हायरस म्यूटेंट वाढू शकतो. त्यामुळे जे लोक कोरोनातून बरे झाले आहे त्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही तसेच सर्वाना सोबत लस देण शक्य होणार नाही.

तसेच या कोरोन महामारीत लस उपलब्धता मर्यादितच आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आणि आणि मृत्यूचा धोका टाळण्यासाठी ज्या लोकांना जास्त गरज आहे त्यांचे लसीकरण करायला हवं असं या रिपोर्टमध्ये आहे.

हे ही वाचा-

ही तर बेसुऱ्यांची फौजच! सोनू कक्कडनं नुसरत फतेह अलींचं गाणं गायल्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

धक्कादायक! हाडे गोठणाऱ्या थंडीत झाली १०० किमी मॅरेथॉन; थंडीमुळे २१ स्पर्धकांचा मृत्यु

डेव्हिड वॉर्नरचा कुटुंबासोबत भन्नाट डान्स, व्हिडिओ पासून व्हाल त्याचे फॅन, पाहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.