‘काहीही करा पण जालिंदरदादांना बरं करा’, कोण आहेत ते ज्यासाठी अजितदादांचा जीव तळमळला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कामाच्या धडाक्याने, विरोधकांना देणाऱ्या रोखठोक उत्तरांनी नेहमीच चर्चेत असतात. अनेक वेळा त्यांच्या हळवेपणाच्या स्वभावाचं उदाहरण समोर येत असतं. त्यांचा हळवेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

अजित पवार लहान होते तेव्हा त्यानां शाळेत सोडण्यासाठी, आणण्यासाठी जालिंदर शेंडगे यांच्याकडे हे काम असायचं. अजित पवार पुढे लहानाचे मोठे झाले. अनेक पदावर त्यांनी कामे केली पण ते लहानपणीच्या ड्रायव्हरला विसरले नाहीत. काही दिवसांपासून ते आजारी असल्याचे अजितदादांना समजले.

अजित पवार यांना निरोप येतो की जालिंदर खूप दिवसापासून आजारी आहेत. अजित पवारांनी हे ऐकताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच बारामतीतील जालिंदर शेंडगे ऍडमिट असलेल्या दवाखान्यात डॉक्टरांना फोन केला आणि म्हणाले की ‘डॉक्टर काहीही करा पण जालिंदरला बरं करा’. डॉक्टरही तात्काळ उपचाराला सुरूवात करून त्यांचा जीव वाचवतात. जालिंदरदादा हळूहळू बरे होताना कळताच अजित पवार यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.

अजित पवार यांचे पीए सुनीलकुमार मूसळे यांनी सोशल मिडीयावर अजित पवार यांचा हा हळवेपणाचा प्रसंग शेअर केला आहे. दादा कितीही कामात व्यस्त असले तरी त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींकडे आणि त्यांच्या कुटूंबीयांकडे दादा लक्ष देतात असं त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे.
म्हत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या अडचणी वाढल्या! उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार ईडीच्या रडारवर
“याला चिंधी विचार म्हणतात, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचं बोला”
भाजपला दणका! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश
… आणि दोन्ही वेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक बळकटीने पुढे आली; सेनेच्या वाघाचं शाहंना रोखठोक उत्तर

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.