ज्ञानदेव वानखेडेंना मोठा धक्का! नवाब मलिकांबाबतची ‘ती’ मागणी न्यायालयाने फेटाळली

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. नवाब मलिक यांना त्यांच्या कुटुंबाविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी केली होती. न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

वानखेडे यांच्या याचिकेवर न्यायालयाने म्हटले की, डिफिटेंड म्हणजे नवाब मलिकांना यांना राईट टू स्पीचचा अधिकार आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोणत्याही अधिकाऱ्याबद्दल कोणतेही विधान करण्यापूर्वी प्रत्येक पैलूची चौकशी किंवा पडताळणी केली पाहिजे.

नवाब मलिक यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे या टप्प्यावर म्हणणे योग्य ठरणार नाही. नवाब मलिक पोस्ट करू शकतात. परंतु कोणतीही गोष्ट पूर्ण चौकशी किंवा पडताळणीनंतरच पोस्ट करा असं कोर्टाने सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले, सत्यमेव जयते. अन्यायाविरुद्ध लढा सुरूच राहणार आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, जात प्रमाणपत्र खोटं असल्याचे आणि ते मुस्लीम असल्याचे असे अनेक आरोप केले आहेत.

मात्र, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अनेक वेळा हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, मलिक यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवरून आता समीर वानखेडे हे खरंच मुस्लीम आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा फोटो समीर वानखेडे यांचा आहे.

यामध्ये ते मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. कबूल, कबूल, कबूल असे मलिक यांनी म्हणत हा फोटो ट्विट केला आहे. याबाबत वानखेडे यांनी आपला धर्म मुस्लीम नसल्याचा दावा केला आहे. पण नवाब मलिकांनी वारंवार अनेक फोटो शेअर करत हा दावा केला आहे की समीर वानखेडे मुस्लीमच आहेत.

महत्वाच्या बातम्या
..म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो भाजपमध्ये या, आयुष्य सुखकर होईल- नितेश राणे
३८ वर्षीय मिताली राज ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारवर झाली फिदा; म्हणाली, मला तो खुप आवडतो
मी खांद्याच्या दुखण्याने बेजार, राकेश चालू शकत नाही; करोडपती गुंतवणूकदार म्हणतोय पैसा सर्वस्व नाही…
शेवटपर्यंत सरकारला दिली नाही जमीन, हायवेच्या मधोमध आहे ‘या’ महिलेचे घर, वाचा अनोखा किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.