दिया मिर्झाच्या हनीमूनला चक्क तिची मुलगीही आहे सोबत; पहा जगावेगळ्या हनीमूनचे फोटो

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा ही वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत 15 फेब्रूवारीला विवाह बंधनात अडकली आहे. वैभव रेखीचे पहिले लग्न झालेले असून त्याला एक मुलगी देखील आहे. अभिनेत्री दीया मिर्झा सोबत दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

दीया आणि वैभवने हनीमून एन्जॉय करण्यासाठी मालदीव हे नयनरम्य ठिकाण निवडले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मालदीवमध्ये त्यांच्यासोबत वैभव रेखीच्या पहिल्या पत्नीची मुलगी समायरा देखील एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

निळ्याशार समुद्र किनाऱ्यावरचा दीया मिर्झा आणि एका सुंदर मुलीचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अनेक युजर्स दीया मिर्झा आणि वैभव रेखीसोबत ही मुलगी कोण आहे? असा सवाल विचारत होते.  वैभवची पहिली पत्नी सुनैना रेखी यांची ही मुलगी असल्याचं समोर आलं आहे.

 

लग्न झाल्यानंतर निवांत क्षण घालवण्याठी पतीपत्नी असे दोघेच जातात. पण दीया मिर्झाने नवऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलीलासोबत घेऊन एन्जॉय करण्यासाठी गेल्याने दीया मिर्झाच्या फॅन्सने तिचे कौतूक केले आहे.

दीया मिर्झा मालदिवच्या निळाशार समुद्र किनाऱ्यावर फोटो शुट केले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच तिने हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर करत चाहत्यांना वेड लावले आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दिया मिर्जाने ‘थप्पड’ चित्रपटात एका घटस्फोटित महिलेची भूमिका निभावली होती. अभिनेत्री तापसी पन्नुसोबत दीयाने भूमिका साकारली होती. लवकरचं दिया तेलगू फिल्म ‘वाईल्ड डॉग’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 2 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर दीयाने शुट केले हॉट फोटो, फोटो पाहून घायाळ व्हाल
सक्तीने निवृत्त केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा मोदी सरकारला टोला, घराबाहेर लावला ‘हा’ फलक
रात्री मला भेटायला बोलवून…; लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासे
जिद्दीला सलाम! नेत्रहीन असणारी ही तरुणी बनली कमी वयात पीएचडी पुर्ण करणारी पहिली महिला

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.