नवऱ्याला वाचवण्यासाठी पत्नी दिव्या खोसला मैदानात; सोनू निगमवर केले गंभीर आरोप

मुंबई | गायक सोनू निगमने नुकताच एक व्हिडिओ शेअर करुन टी- सीरिजचे मालक भूषण कुमारवर जोरदार निशाणा साधला होता. सोनू निगमने भूषण कुमारवर टीका करणारा व्हिडीओ त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता.

याचाच धागा पकडत भूषण कुमारची पत्नी आणि अभिनेत्री दिव्य कुमार खोसला ही मैदान उतरली आहे. पतीची बाजू घेत दिव्या खोसलाने सोनू निगमवर गंभीर आरोप केले आहेत. दिव्याने एकापाठोपाठ एक अशा दोन स्टोरी शेअर केल्या आहेत ज्यात तिने सोनू निगमच्या यशात टी-सीरिजचा सिंहचा वाटा असल्याचे ती सांगतेय.

दिव्या खोसलाने सोनू निगमला प्रश्न विचारला की, ‘जेव्हा भूषण कुमार हे संगीत क्षेत्रात टी- सीरिजमध्ये १००% लोकांना संधी देण्याचा प्रयत्न करतात मात्र, त्यातील फक्त ८०% टक्के लोकांना संधी मिळते, यामध्ये गायकाने काय केलयं? तसेच पुढे ती सोनूला विचारतीये, कधी भूषण कुमार यांनी बाकी गायकांना संधी दिली आणि नंतर ‘नाही’ असे सांगितले आहे का?

दिव्याने आणखी एक गंभीर आरोप सोनूवर लावला आहे. याबाबत बोलताना ती म्हणतीये, जेव्हा भूषण कुमार सुरुवातीच्या टप्प्यात होते, तेव्हा टी- सीरिजला तुझी गरज होती मात्र तू टी- सीरिज सोडून दुसरीकडे गेलास, असे दिव्या म्हणाली.

दरम्यान, सोनू निगम आणि भूषण कुमार यांच्यातील वादाने आता वेगळेच वळण घेतले असून सोनूचे कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्याशी संबंध होते, असा गंभीर आरोप भूषण कुमारांची पत्नी दिव्या खोसला यांनी केला आहे.

दिव्याने पुढे म्हंटले आहे की, ‘सोनू निगमने जेव्हा टी- सीरिज आणि भूषण कुमार यांच्यावर संगीत क्षेत्रातील माफिया असा आरोप केला होता. त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमक्या येत होत्या. तसेच पुढे दिव्याने सांगितले की, सोनू निगमने व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोकांचे खंडणीसाठी फोन येत असल्याचे दिव्याने सांगितले.

दरम्यान, शेवटी दिव्याने सोनूला आठवण करुन दिली की, त्याच्या पत्नीने दिव्यावर कसे जाहीरपणे आरोप केले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोनू निगमने व्हिडिओ शेअर करून अभिनय क्षेत्रात घराणेशाही आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाल्याचे म्हटले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या
मी मरतीय…! सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे ठरले; अन्…
पहा सोनू सुदच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो; इंटेरियरसाठी केले आहेत लाखो रुपये खर्च
सुशांत सिंग राजपूतच नाही तर ‘या’ अभिनेत्यांचे चित्रपट देखील त्यांच्या निधनानंतर रिलीज झाले होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.