टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका! कोरोनाने घेतला अभिनेत्रीचा बळी

सोमवारी टीव्ही इंडस्ट्रीला मोठा झटका लागला आहे. व्हेंटीलेटरवर आयुष्याशी लढा देणारी अ‍ॅक्ट्रेस दिव्या भटनागरचे निधन झाले आहे. दिव्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तिला गोरेगावमधील एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

अभिनेत्री दिव्या भटनागर गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत होती. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली आहे. दिव्याला २८ नोव्हेंबरला आपण कोरोना संक्रमित असल्याचे कळले.

दिव्या गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर जीवनाची लढाई लढत होती, त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती ३४ वर्षांची होती. दिव्या कोरोना विषाणूची बळी ठरली, त्यानंतर तिला गोरेगावच्या एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिव्या भटनागर हे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गुलाबो’, उडान’, ‘जीत गई तो पिया मोरे’, ‘विष’ सारख्या शोमध्ये काम केले आहे.

दिव्याने आर्टिस्ट मॅनेजर गगनशी लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दिव्याच्या आईने एका मुलाखतीदरम्यान दिव्याच्या पतीला फ्रॉड असल्याचे म्हटले होते. दिव्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी, शिल्पा शिरोडकर तसेच अनेक कलाकारांनी सोशल मिडियावर दिव्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलीवूडच्या ‘या’ ब्युटीसोबत युवराज सिंगला करायचे होते लग्न पण….

अर्णबच्या अडचनी वाढल्या! सुप्रीम कोर्टाने दिला जोरदार झटका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.