एवढ्या वर्षांना दिव्या भारतीच्या आईने केला खुलासा; म्हणाल्या, आमिरने दिव्याला चित्रपटातून काढले आणि…

९० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्र्यांबद्दल बोलले जात असेल आणि त्यात दिव्या भारतीचे नाव आले नाही. तर ती यादी अपूर्ण राहते. फक्त १६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या दिव्याने फक्त तीन वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये चांगलेच नाव कमवले होते.

दिव्या भारतीने खुप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली होती. कमी वेळातच तिने बॉलीवूडच्या अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यानंतर दिव्याने जॅकी श्रॉफ, शाहरुख खान, सनी देओल आणि रुषी कपूर अशा अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.

पण तिची जोडी सर्वाधिक गाजली ती म्हणजे सनी देओलसोबत. दिव्या भारतीच्या डेब्यूनंतर इँडस्ट्रीतील अभिनेत्रींना भीती वाटत होती. तर दुसरीकडे अभिनेते दिव्यासोबत काम करायला तयार होते. अभिनेते दिग्दर्शकांना दिव्याला चित्रपटामध्ये घेण्याची विनंती करायचे.

असाच एक अभिनेता म्हणजे सनी देओल. सनी देओल त्याकाळी खुप मोठा स्टार होता. त्याची आणि दिव्या भारतीची जोडी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबास्टर होती. म्हणून सनी त्याच्य प्रत्येक चित्रपटाच्या दिग्दर्शकाडे दिव्याला घेण्याची विनंती करत होता.

तेव्हा सनी देओल ‘डर’ चित्रपटामध्ये काम करत होता. या चित्रपटासाठी त्याने दिव्याला फायनल केले होते. दिव्या भारतीला देखील चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती. पण चित्रपट साइन करण्या अगोदर ती एका कार्यक्रमासाठी दुबईला गेली होती. त्यामूळे तिला चित्रपट साईन करता आला नाही.

या कालावधीमध्ये डर चित्रपटात आमिर खानची एन्ट्री झाली. आमिरने दिग्दर्शकांना अभिनेत्री बदलायला सांगितले. आमिरच्या प्रसिद्धी पुढे दिग्दर्शकांनी हार मानली आणि त्यांनी जुही चावलाला चित्रपटामध्ये घेतले. आमिर खानमूळे दिव्या भारतीने एक हिट चित्रपट गमवला होता.

दिव्या भारतीला चित्रपटातून काढल्यानंतर आमिरने देखील काही दिवसांनी डर चित्रपट करायला नकार दिला. कारण त्याला करिअरच्या सुरुवातीला नकारात्मक भुमिका साकारायची नव्हती. पण आमिरच्या एका चुकीमूळे दिव्या भारतीने त्यांच्या करिअरमधली चांगला चित्रपट गमवला होता.

दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर अनेक दिवसांनी त्यांच्या आईने एका मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. त्यामूळे सर्वांना धक्का बसला होता. पण त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला असे अनेक चित्रपट गमावले आहेत. तरीही त्या बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्री आहेत.

महत्वाच्या बातम्या –

४८ वर्षांच्या मंदिरा बेदीचे बिकनीतील फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अनन्या पांडेची बहीण अलानाचे फोटो झाले व्हायरल; फोटोवरुन तुमची नजर हटणार नाही

ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारीला मृत्यूनंतर मृत्यूच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या; कारण…

‘या’ विवाहीत व्यक्तिसोबत शाहरुख खानच्या मुलीला जायचे आहे डेटवर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.