मृत्यूपूर्वी दिव्या भारतीने केल्या होत्या ‘ह्या’ गोष्टी; जाणून आश्चर्य वाटेल

दिव्या भारती फिल्म इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे. जिने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये यश मिळवले आहे. अनेक अभिनेत्री वर्षानुवर्षे इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात पण तरीही त्यांना यश मिळत नाही. पण दिव्याने मात्र कमी वेळेत यश मिळवले होते.

५ एप्रिल १९९३ ला वयाच्या १९ वर्षी दिव्या भारतीचे निधन झाले होते. तिच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. पोलिसांच्या मते दिव्याचा मृत्यू एक अपघात होता. पण लोकांना आजही वाटते की, दिव्याचा मृत्यू पुर्णपणे प्लॅन होता.

दिव्याने १९९० मध्ये तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. काही दिवसांमध्ये ती साऊथची सुपरस्टार झाली होती. त्यानंतर १९९२ मध्ये तिने बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. डेब्युनंतर खुप कमी वेळात ती स्टार झाली होती.

शोला और शबनम चित्रपटाच्या शुटींग तिची आणि निर्माता साजिद नाडीयाडवालाची पहिली भेट झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दिव्या भारतीला १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दिव्या खुप आनंदी होती. तिने दोघांसाठी मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केला होता. नवीन घरात जाण्यासाठी ती खुप उत्साही होती. पण त्यापूर्वीच तिच्या मृत्यूने सर्वांना धक्का दिला.

५ एप्रिलला दिव्या शुटींग पुर्ण करून घरी परत आली.
त्यावेळी तिला फॅशन डिझायनर नीता लुल्लाचा फोन आला. रात्री १० वाजता नीता पतीसोबत दिव्याच्या घरी गेली होती. तिघांनी जेवण केले आणि गप्पा मारत बसले.

थोड्या वेळाने दिव्या खिडकीकडे गेली आणि तिथे थांबून बाहेर बघत होती. पण तेवढ्यात दिव्याला तोल गेला आणि ती खिडकीतून खाली पडली. कोणाला काही समजण्या अगोदर दिव्या पाचव्या माजल्यावरून खाली पडली होती.

दिव्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता. आजही दिव्या भारतीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. पण तिच्या मृत्यूचे रहस्य कोणालाही समजले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

एकेकाळी १० रुपयात चित्रपट करणाऱ्या जयाप्रदा आज करोडोंच्या मालकीण; आहेत पाच पाच बंगले

बॉलीवूडवर कोरोनाचा कहर! अनेक कलाकारांनी प्राॅपर्टी विकत मुंबईला दिला निरोप

एका विवाहित पुरुषाच्यामागे झाली होती वेडी, रेखा यांनी दिली कबुली; म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.