१९९८ मध्ये घटस्फोटासाठी केला होता अर्ज, तब्बल २१ वर्षांनी कोर्टाचा निर्णय पाहून दाम्पत्य झाले हैराण

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने बुधवारी एक मोठा निर्णय दिला आहे. हा निर्णय मोठा यासाठी ठरला कारण हे दाम्पत्य गेल्या २१ वर्षांपासून घटस्फोटासाठी न्यायालयीन लढाई लढत होते. तब्बल २१ वर्षांनंतर आंध्र प्रदेशाच्या जोडप्याला कोर्टाने निर्णय सुनावला. हा निर्णय ऐकून अनेकजण हैराण झाले आहे.

तेलगु भाषेत सर्वोच्च न्यायालयाची कारवाई चीफ जस्टिस एनवी रमण यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने पती आणि पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या सुप्रीम कोर्टाची कामकाजाची इंग्रजी भाषा महिलेला येत नसल्यामुळे चीफ जस्टिस यांनी स्वत: तेलुगु भाषेत संवाद केला, आणि सहकारी जस्टिस यांनाही महिलेचे म्हणणे समजून सांगितले.

पतीची शिक्षा वाढविण्यासाठी महिलेने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले होते. यावेळी चीफ जस्टिस म्हणाले की, जर तुझा पती तुरुंगात गेला तर त्याची नोकरी नसल्यामुळे तुम्हाला महिन्याचा निधी मिळू शकणार नाही. आंध्र प्रदेश सरकारचे कर्मचारी आणि गुंटुरमध्ये तैनात पतीकडील वकील डी. रामकृष्णा म्हणाले की, चीफ जस्टिसने महिलेला तेलुगुमध्ये कायदेशीर स्थिती सांगितली आणि स्पष्ट केले की, कैद वाढल्यामुळे पती-पत्नी दोघांनाही फायदा मिळणार नाही.

रेड्डी यांनी चीफ जस्टिस यांच्या हवाल्याने सांगितले की, जर तुरुंगातील अवधी वाढवला तर तुम्हाला काय मिळेल? तुम्हाला मिळणारे मासिक उत्पन्नही थांबेल. महिलेने सर्व शांतपणे ऐकले, शेवटी पतीसोबत राहण्यास तयार झाली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पती-पत्नीला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. या प्रतिज्ञापत्रात पती-पत्नी यांना एकत्र राहायचे असल्याचा उल्लेख करण्यास सांगण्यात आले.

याशिवाय पत्नीने हाय कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली अपील मागे घेणे आणि पतीविरोधात हुंड्यासाठी त्रास देण्याची सुनावणी संपविण्याचा अर्ज करणार असल्याच्या अटीवर सहमती झाली. याशिवाय पतीही घटस्फोटाची याचिका मागे घेण्यास तयार झाला. या दाम्पत्याचा १९९८ मध्ये विवाह झाला होता.

मात्र दोघांमध्ये सतत वाद सुरू होता. ज्यामुळे महिलेने २००१ मध्ये पतीविरोधात तक्रार दाखल केली. यामध्ये तिने हुंड्यांसाठी पती त्रास देत असल्याचे सांगितले होते. त्यावेळीही दोघांमधील वाद सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तेव्हा ते शक्य झाले नाही. शेवटी तब्बल २१ वर्षांनी सुप्रीम कोर्टात याचा निर्णय लागला.

ताज्या बातम्या

कडक! महेंद्रसिंगच्या नव्या लूकनं सोशल मीडियावर लावली आग; फोटो तुफान व्हायरल

…म्हणून शेतकऱ्याने शेतात लावले सनी लिओनीचे पोस्टर, जाणून घ्या, काय आहे कारण

आधी बलात्कार केला, मग माफी, मग लग्न आणि मग लसीच्या बहाण्याने केले असे काही की पोलिसही हादरले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.